रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसद प्रश्न : वर्ष 2026–27 साठी रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता 23,926 कोटी रुपयांची तरतूद

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2026 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2026

 

महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पांची स्थिती पुढीलप्रमाणे:

रेल्वे अर्थसंकल्प:

गेल्या पाच वर्षांत अर्थसंकल्पीय तरतुदीत लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पूर्णपणे किंवा अंशतः येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सुरक्षाविषयक कामांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद खालीलप्रमाणे:

कालावधी

तरतूद

2009-14

₹1,171 कोटी /वर्ष

2026-27

₹23,926 कोटी (20 पटींहून अधिक)

 

रेल्वेमार्ग बांधणी

महाराष्ट्रात 2009-14 आणि 2014-26 या कालावधीत पूर्णपणे किंवा अंशतः राज्यात येणाऱ्या नव्या रेल्वे मार्गांच्या बांधकामाचा तपशील खालीलप्रमाणे :

कालावधी

कार्यान्वित झालेला नवीन मार्ग

नवीन मार्गांचे सरासरी कार्यान्वयन

2009-14

292 किमी

58.4 किमी /वर्ष

2014-26

2,585किमी

215.4 किमी /वर्ष (जवळपास 4 पट)

 

मंजूर प्रकल्प:

महाराष्ट्रात 01.04.2026 नुसार, राज्यात पूर्णपणे किंवा अंशतः येणाऱ्या 1,42,635 कोटी रुपये खर्चाच्या, एकूण 5,956 किमी लांबीच्या, 52 प्रकल्पांना (13 नवीन मार्ग, 02 गेज रूपांतर आणि 37 दुपदरीकरण) मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:-

प्रकार

मंजूर प्रकल्पांची संख्या

एकूण

लांबी

(किमी मध्ये)

कार्यन्वित लांबी

मार्च '26 पर्यंत (किमी)

खर्च

मार्च '26 पर्यंत

(₹ कोटींमध्ये)

नवीन मार्ग

13

1,399

266

13,065

गेज रूपांतर

02

609

334

5,013

दुहेरीकरण/बहुमार्ग

37

3,948

998

16,704

एकूण

52

5,956

1,598

34,782

 

अलीकडे पूर्ण झालेले प्रकल्प:

महाराष्ट्रात पूर्णपणे किंवा अंशतः समाविष्ट असलेल्या अलीकडे पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचा तपशील पुढीलप्रमाणे :

क्र.

प्रकल्प

खर्च

(₹ कोटींमध्ये )

1

पुणे-मिरज-लोंढा दुहेरीकरण (467 किमी)

6,463

2

होटगी-कुडगी-गदग दुहेरीकरण (284 किमी)

2,459

3

मनमाड-जळगाव 3 री मार्गिका (160 किमी)

1,677

4

जबलपूर-गोंदिया गेज रूपांतर (300 किमी)

2,005

5

छिंदवाडा-नागपूर गेज रूपांतर (150 किमी)

1,512

6

पनवेल-पेण दुहेरीकरण (35 किमी)

263

7

पेण-रोहा दुहेरीकरण (40 किमी)

330

8

उधना-जळगाव दुहेरीकरण (307 किमी)

2,448

9

मुदखेड-परभणी दुहेरीकरण (81 किमी)

673

10

भुसावळ-जळगाव 3री मार्गिका (24 किमी)

325

11

जळगाव-भुसावळ 4 थी मार्गिका (24 किमी)

261

12

दौंड-गुलबर्गा दुहेरीकरण (225 किमी)

3,182

13

दौंड-मनमाड दुहेरीकरण (236 किमी)

3,426

 

सध्या सुरू असलेले प्रकल्प:

महाराष्ट्रातल्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील कामे हाती घेण्यात आली आहेत:-

क्र.

प्रकल्पाचे नाव

खर्च

(₹ कोटींमध्ये )

1

अहिल्यानगर-परळी वैजनाथ नवा मार्ग (261किमी )

5,800

2

बारामती लोणंद नवा मार्ग (64 किमी )

1,844

3

वर्धा-नांदेड नवा मार्ग (284 किमी )

5,248

4

इंदौर-मनमाड नवा मार्ग(360 किमी )

18,529

5

वडसा-गडचिरोली नवा मार्ग (52 किमी )

1,886

6

जालना-जळगाव नवा मार्ग (174 किमी )

5,804

7

वर्धा-नागपूर 3 री मार्गिका (76 किमी )

917

8

वर्धा-बल्हारशाह 3 री मार्गिका (132 किमी )

1,755

9

इटारसी-नागपूर 3 री मार्गिका (280 किमी )

2,607

10

राजनंदगाव-नागपूर 3 री मार्गिका (228 किमी )

3,545

11

वर्धा-नागपूर 4 थी मार्गिका (79 किमी )

1,215

12

जळगाव-मनमाड 4 थी मार्गिका (160 किमी )

2,574

13

भुसावळ-खांडवा 3 री आणि 4 थी मार्गिका (131 किमी )

3,285

14

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवा मार्ग (84 किमी )

3,296

15

पनवेल-चौक दुहेरीकरण (17 किमी )

491

16

वर्धा-बल्हारशाह 4 थी मार्गिका (135 किमी )

2,226

17

इटारसी -नागपूर 4 थी मार्गिका (297 किमी )

5,010

18

वर्धा-भुसावळ 3 री आणि 4 थी मार्गिका (314 किमी )

9,197

19

गोंदिया-डोंगरगड 4 थी मार्गिका (84 किमी )

2,223

20

गोंदिया-बल्हारशाह दुहेरीकरण (240 किमी )

4,819

21

कल्याण-कसारा 3 री मार्गिका (68 किमी )

1,433

22

नायगाव-जुचंद्र डबल कॉर्ड लाइन(5 किमी )

176

23

निळजे-कोपर डबल कॉर्ड लाइन (5 किमी )

338

24

बदलापूर-कर्जत 3 री आणि 4 थी मार्गिका (32 किमी )

1,324

25

आसनगाव-कसारा 4 थी मार्गिका (35 किमी )

794

26

कसारा-मनमाड 3 री आणि 4 थी मार्गिका (131 किमी )

10,154

27

गोंदिया-जबलपूर दुहेरीकरण (231 किमी )

5,236

28

चाळीसगाव रेल्वे ओव्हर रेल फ्लायओव्हर (11किमी)

264

29

चिखली आणि सोमाटणे दरम्यान कॉर्ड लाईन (4 किमी)

172

 

मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी क्षमता वाढीची कामे

सध्या मुंबई परिसरात दरदिवशी सुमारे 120 मेल/एक्सप्रेस गाड्या आणि 3200 उपनगरीय गाड्यांचे परिचालन केले जाते. मुंबई परिसरातील विविध स्थानकांची गाड्या हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी, विविध स्थानकांवर पुढील कामे पूर्ण करण्यात आली आहेत, हाती घेण्यात आली आहेत किंवा नियोजित आहेत:

अनुक्रमांक

ठिकाण

तपशील

1

वांद्रे टर्मिनस

3 पिट लाइन्सचे काम पूर्ण झाले आहे.

 

2

मुंबई सेंट्रल

24 एलएचबी डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार

 

3

जोगेश्वरी

5अतिरिक्त प्लॅटफॉर्म्स, 2 पिट लाईन्स

4

दादर

1 अतिरिक्त प्लॅटफॉर्म

5

पनवेल-कळंबोली

5 प्लॅटफॉर्म्स, , 4 पिट लाईन्स आणि 2 सिक लाईन्स

6

कल्याण

6 प्लॅटफॉर्म्स आणि 4 पिट लाईन्स

7

एलटीटी

4 प्लॅटफॉर्म्स आणि 2 पिट लाईन्स

8

परळ

6 प्लॅटफॉर्म्स , 5 पिट लाईन्स, 6 स्टेब्लिंग लाईन्स

9

वसई-विरार परिसर

वसई रोड: 6 प्लॅटफॉर्म्स, 3 पिट लाईन्स आणि 5 स्टेब्लिंग लाईन्स

नायगांव- 30 स्टेब्लिंग लाईन्स

विरार- 2 स्टेब्लिंग लाईन्स

10

डहाणू परिसर

डहाणू: 5 स्टेब्लिंग लाईन्स

न्यू वनगाव: 30 स्टेब्लिंग लाईन्स

 

याव्यतिरिक्त, 15-डब्यांच्या ईएमयू गाड्या सामावून घेण्यासाठी 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे.

 

क्षमता वाढवण्यासाठीचे नवीन प्रकल्प:

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील रेल्वे जाळ्याची कनेक्टिव्हिटी आणि क्षमता वाढविण्यासाठी, 4,502 कोटी रुपये खर्चाच्या 'मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प' (एमयूटीपी)-I, 8,087 कोटी रुपये खर्चाच्या एमयूटीपी-II, 10,947 कोटी रुपये खर्चाच्या एमयूटीपी-III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाच्या एमयूटीपी-IIIA या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील खालील कामांचा समावेश आहे:

अनुक्र.

प्रकल्पाचे नाव

खर्च

(कोटी रु. मध्ये)

1

मुंबई सेंट्रल-बोरिवली 6वी लाईन(30 किमी)

919

2

गोरेगाव-बोरिवली हार्बर लाईनचे विस्तारीकरण (7किमी)

826

3

विरार-डहाणू रोड 3री आणि 4थी लाईन (64 किमी)

3,587

4

सीएसटीएम-कुर्ला 5वी आणि 6वी लाईन (18 किमी)

891

5

पनवेल-कर्जत उपनगरी मार्गिका (30 किमी)

2782

6

ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरी मार्गिका लिंक (3 किमी)

476

7

बोरिवली-विरार 5वी आणि 6वी लाईन (26किमी)

2,184

8

कल्याण-आसनगाव दरम्यानची 4थी लाईन (32किमी)

1,759

9

कल्याण-बदलापूर दरम्यानची 3री आणि 4थी लाईन (14.05 किमी)

1,510

10

कल्याण यार्ड - मुख्य मार्ग आणि उपनगरीय मार्ग यांचे विलगीकरण

866

11

नायगाव आणि जुचंद्र दरम्यानचा वसई बायपास मार्ग (दुहेरी मार्ग)

(5.73किमी)

176

12

बदलापूर आणि कर्जत दरम्यानची 3 री आणि 4थीलाईन (32.46 किमी)

1,324

13

आसनगाव आणि कसारा दरम्यानची 4थीhलाईन (34.97 किमी

794

14

अनाधिकृत प्रवेश नियंत्रण (34 ठिकाणे)

551

 

कल्याण आणि कसारा (68 किमी) दरम्यानच्या तिसऱ्या लाईनच्या कामासाठी 1,433 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. मार्च 2026 पर्यंत 1,067 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पाची विभागवार प्रगती पुढीलप्रमाणे:

अनुक्र.

सेक्शन

कामातील प्रगती

1

उंबरमाली -खर्डी (13किमी)

भूसंपादन: 5 Ha, पूर्ण

स्थानक, इमारती: 01 , पूर्ण

ट्रॅक लिंकिंग: पूर्ण

2

खर्डी - आसनगाव (22 किमी

भूसंपादन: 23 पैकी 22 Ha जागा अधिग्रहित करण्यात आली असून उर्वरित जागेच्या अधिग्रहणाचे काम हाती घेण्यात आले आहे

प्रमुख पूल: 01, काम हाती घेण्यात आले आहे

स्थानक इमारती: 03, सर्व पूर्ण

ट्रॅक लिंकिंग: 22 पैकी 10 टीकेएम पूर्ण आणि उर्वरित काम सुरू केले आहे

3

आसनगाव-खडवली (14 किमी)

भूसंपादन: 11पैकी 10 Ha जमीन अधिग्रहित करण्यात आली असून उर्वरित जागेच्या अधिग्रहणाचे काम हाती घेण्यात आले आहे

मुख्य पूल: 04 पैकी 02 पूर्ण उर्वरित काम सुरू आहे

4

खडवली - कल्याण (18 किमी)

भूसंपादन: 15 पैकी 11 Ha जमीन अधिग्रहित करण्यात आली असून उर्वरित जागेच्या अधिग्रहणाचे काम हाती घेण्यात आले आहे

मुख्य पूल: 04 पैकी 02 पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू झाले आहे

स्थानक इमारती: 01 , पूर्ण

 

कल्याण आणि आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेसाठी (32.22 किमी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)-3A अंतर्गत 1759 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

विभागाचे नाव

कामाची सद्यस्थिती

कल्याण - आसनगाव (32.22 किमी)

भूसंपादन: 28 हेक्टरपैकी 17 हेक्टर भूसंपादन पूर्ण.

 

मातीचे काम: 13.32 लाख घनमीटरपैकी 2.58 लाख घनमीटर मातीचे काम पूर्ण.

 

महत्त्वाचे/मोठे पूल: 7 पैकी 6 पुलांचे काम प्रगतिपथावर.

 

लहान पूल: 92 पैकी 8 कामे पूर्ण, आणि उर्वरित 84 कामे प्रगतीपथावर.

 

वरील दोन प्रकल्पांव्यतिरिक्त, भिवंडी लोकसभा मतदारसंघात पूर्णपणे किंवा अंशतः येणाऱ्या इतर प्रकल्पांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव (लांबी)

सद्यस्थिती

1.

कल्याण - मुरबाड नवीन रेल्वे मार्ग (28 किमी)

भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

2.

आसनगाव - कसारा 4 थी मार्गिका (35 किमी)

नुकतीच मंजुरी मिळाली.

3.

कसारा - मनमाड 3 री आणि 4 थी मार्गिका (131 किमी)

नुकतीच मंजुरी मिळाली.

 

नवीन प्रकारच्या गाड्या:

प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, MUTP-III आणि IIIA अंतर्गत 19,293 कोटी रुपये खर्चाने प्रत्येकी 12 डबे (दरवाजांसह) असलेल्या 238 रेकना मंजुरी देण्यात आली आहे. या रेकच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

बुलेट ट्रेन प्रकल्प:

सध्या, मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्प (508 किमी) प्रगतीपथावर आहे . हा मार्ग गुजरात, महाराष्ट्र ही राज्ये आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जातो. यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती इथे 12 स्थानके नियोजित आहेत.

या प्रकल्पासाठी संपूर्ण जमीन (1389.5 हेक्टर) अधिग्रहित करण्यात आली आहे. सर्व वैधानिक मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत. सर्व 1651 उपयुक्तता हलविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या भूसंपादनातल्या विलंबामुळे 2021 पर्यंत प्रकल्पावर परिणाम झाला. महाराष्ट्रात 2022 मध्ये भूसंपादनाला गती आली.

विविध प्रमुख बाबींची आतापर्यंतची प्रगती खालीलप्रमाणे आहे:

बाब

प्रगती

पियर्स (Piers)

452 किमी.

गर्डर (Girder)

356 किमी.

ट्रॅक बेड (Track Bed)

209 किमी.

ओएचइ मास्ट (OHE Masts)

190 किमी.

 

स्थानकांची प्रगती खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.

स्थानक

सद्यस्थिती

1

साबरमती

पायाभूत कामे पूर्ण, फलाटाची स्लॅब, छताची संरचनात्मक कामे आणि अंतिम टप्प्यातली कामे सुरू आहेत.

2

अहमदाबाद

संरचनात्मक कामे पूर्ण आणि अंतिम टप्प्यातली कामे हाती घेतली आहेत.

3

आणंद/नडियाद

संरचनात्मक कामे पूर्ण आणि अंतिम टप्प्यातील कामे हाती घेतली आहेत.

4

वडोदरा

पायाभूत कामे पूर्ण, संरचनात्मक कामे आणि अंतिम टप्प्यातली कामे हाती घेतली आहेत.

5

भरूच

संरचनात्मक कामे पूर्ण आणि अंतिम टप्प्यातली कामे हाती घेतली आहेत.

6

सुरत

संरचनात्मक कामे पूर्ण आणि अंतिम टप्प्यातली कामे हाती घेतली आहेत.

7

बिलीमोरा

संरचनात्मक कामे पूर्ण आणि अंतिम टप्प्यातली कामे हाती घेतली आहेत.

8

वापी

संरचनात्मक कामे पूर्ण आणि अंतिम टप्प्यातली कामे हाती घेतली आहेत.

9

बोईसर

पायाभूत कामे हाती घेतली असून, ती प्रगत टप्प्यात आहेत. संरचनात्मक कामे हाती घेतली आहेत.

10

विरार

पायाभूत कामे हाती घेतली असून ती प्रगत टप्प्यात आहेत. संरचनात्मक कामे हाती घेतली आहेत.

11

ठाणे

पायाभूत कामे हाती घेतली असून ती प्रगत टप्प्यात आहेत. संरचनात्मक कामे हाती घेतली आहेत.

12

बीकेसी (मुंबई)

हे भूमिगत स्थानक आहे. पायाभूत कामे जवळपास पूर्ण झाली असून बेस स्लॅबचे काम हाती घेण्यात आले आहे.

 

नदीवरील पुलांची प्रगती खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.

नदीचे नाव

सद्यस्थिती

1

साबरमती नदी (480 मी)

सब-स्ट्रक्चरचे काम पूर्ण, सुपरस्ट्रक्चरचे काम हाती घेण्यात आले आहे.

2

मेश्वा नदी (120 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

3

वात्रक नदी (280 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

4

मोहर (शेढी) नदी (160 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

5

मही नदी (720 मी)

12 पैकी 11 विहिरी पूर्ण; 5 स्पॅन लाँच केले.

6

विश्वामित्री नदी (80 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

7

ढाढर नदी (120 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

8

नर्मदा नदी (1366 मी)

25 पैकी 21 विहिरी पूर्ण; 4 स्पॅन लाँच केले.

9

कीम नदी (120 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

10

तापी नदी (720 मी)

पायाभूत कामे हाती घेतली आहेत, 12 पैकी 10 विहिरी पूर्ण.

11

मिंढोळा नदी (240 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

12

पूर्णा नदी (360 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

13

अंबिका नदी (200 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

14

वेंगणिया नदी (200 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

15

कावेरी नदी (120 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

16

खारेरा नदी (120 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

17

औरंगा नदी (320 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

18

पार नदी (320 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

19

कोलक नदी (160 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

20

दमण गंगा नदी (360 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

21

दरोठा नदी (80 मी)

पुलाचे बांधकाम पूर्ण.

22

जगानी नदी (360 मी)

पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत.

23

वैतरणा नदी (2320 मी)

12 पाईल कॅप (Pile Cap) आणि 11 पियर (Pier) (58 पैकी) पूर्ण.

24

उल्हास नदी शाखा (120 मी)

पायाभूत कामे सुरू करण्यासाठी तात्पुरता प्रवेश पूल (TAB) पूर्ण.

25

देसाई खाडी नदीवरील पूल (400 मी)

भू-तांत्रिक तपासणी (GTI) पूर्ण झाली असून डिझाइनचे काम हाती घेण्यात आले आहे.

 

समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचे (अंदाजे 21 किमी) काम सुरू झाले आहे, त्यापैकी महाराष्ट्रातील घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या 4.8 किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

पुलाच्या उभारणीसह, सुरत-वापी या 97 किमीच्या टप्प्यातील सर्व बांधकामे पूर्ण झाली आहेत आणि रूळांचा पाया घालण्याचे काम 87% पूर्ण झाले आहे.

मात्र, बुलेट ट्रेन प्रकल्प हा खूप गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानाचे प्राबल्य असलेला प्रकल्प आहे. सर्व स्थापत्य संरचना, रूळ, वीज पुरवठा, सिग्नल यंत्रणा आणि दूरसंचार यांच्याशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर तसेच गाड्यांच्या डब्यांच्या संचाविषयी निश्चित माहिती समजल्यानंतर संपूर्ण प्रकल्पाच्या पूर्ततेची निश्चित कालमर्यादा ठरवता येऊ शकेल.

तसेच, राष्ट्रीय वाहतूकविषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, प्रादेशिक संपर्क जोडणी, आर्थिक विकास, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांना चालना देणे तसेच रस्ते आणि हवाई वाहतुकीकडून रेल्वे वाहतुकीकडे पद्धतशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणे या उद्देशाने सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये खालील सात उच्च-वेगवान रेल्वे (एचएसआर) मार्गिकांच्या विकासाची घोषणा केली आहे:-

  1. मुंबई-पुणे
  2. पुणे-हैदराबाद
  3. हैदराबाद-बंगळूरु
  4. हैदराबाद-चेन्नई
  5. चेन्नई-बंगळूरू
  6. दिल्ली-वाराणसी
  7. वाराणसी-सिलीगुडी

कोणताही एचएसआर मार्गिका/प्रकल्प मंजूर करण्याचा निर्णय अत्यंत भांडवलसंवेदी असल्यामुळे तो डीपीआरचे परिणाम, तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यताविषयक अभ्यास तसेच वित्तपुरवठ्याच्या पर्यायांसारख्या संसाधनांची उपलब्धता यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.

 

समर्पित मालवाहतूक मार्गिका:

रेल्वे मंत्रालयाने लुधियाना ते सोननगर ही 1337 किमीची पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका (ईडीएफसी) तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल (जेएनपीटी) ते दादरी ही 1506 किमी ची पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका (डब्ल्यूडीएफसी) या दोन समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे बांधकाम हाती घेतले आहे.

ईडीएफसी तसेच डब्ल्यूडीएफसी यांचे काम पूर्ण झाले असून या मार्गांवर परिचालन सुरु झाले आहे. या डीएफसीजवर दर दिवशी सरासरी 443 पेक्षा अधिक गाड्या धावतात. पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकांवरील (ईडीएफसी आणि डब्ल्यूडीएफसी) संपूर्णपणे कार्यान्वित झालेल्या विभागांनी परिचालनविषयक सशक्त कामगिरीचे दर्शन घडवले आहे. मालवाहतुकीचे प्रमाण निश्चित वेगाने वाढत आहे आणि अधिक सरासरी वेग, जलद फेऱ्या आणि सुधारित खात्रीशीरपणा उपलब्ध होत आहे. या मार्गिका कंटेनर, कोळसा आणि मोठ्या प्रमाणातील कार्गो वाहतुकीत सातत्याने वाढ दर्शवत असून मालवाहतूकीची क्षमता वाढवण्यात लक्षणीयरित्या योगदान देत आहेत.

ईडीएफसी आणि डब्ल्यूडीएफसीकडे मालवाहतूक वळवून डीएफसीने पारंपरिक नेटवर्कमध्ये अतिरिक्त मार्गांची निर्मिती करण्यात योगदान दिले आहे. त्यामुळे रेल्वेला स्वतःच्या नेटवर्क मध्ये अतिरिक्त वस्तू आणि प्रवासी वाहतूक सेवा देणे शक्य झाले आहे. डीएफसीजमुळे अधिक जलद प्रवास काळ, उच्च थ्रूपुट तसेच दुहेरी-थरांच्या कंटेनर्सचे (विशेषतः पश्चिम डीएफसीवर) परिचालन शक्य झाले आहे. या सुधारणांनी एकंदर लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यात, पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारण्यात आणि भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.

पूर्वेकडील दानकुनीला पश्चिमेकडील सुरत शहराशी जोडणाऱ्या नव्या समर्पित मालवाहतूक मार्गिकेची देखील घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये करण्यात आली आहे. या मार्गिकेसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार करुन अपडेट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

* * *

सुषमा काणे/सोनाली कुलकर्णी/ मंजिरी गानू/ निखिलेश चित्रे/ संजना चिटणीस/ दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2287794) आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English