युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र मुंबईतर्फे 30 जुलै रोजी महिला कुस्तीसाठी निवड चाचण्यांचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2026 12:11PM by PIB Mumbai

मुंबई, 22 जुलै 2026

 

भारत सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) मुंबई येथील 'नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स' (एनसीओई) द्वारे, 30 जुलै 2026 रोजी  'एसएआय श्री अटलबिहारी वाजपेयी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स', अकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे महिला कुस्तीसाठी निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा किंवा राष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये 5व्या स्थानापर्यंत पात्र ठरलेल्या, अथवा गेल्या दोन वर्षांत मान्यताप्राप्त राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या महिला कुस्तीपटूंसाठी या चाचण्या खुल्या आहेत.

30 जुलै 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता उपस्थिती नोंदवून (रिपोर्टिंगने) या चाचण्यांना सुरूवात होईल. पात्र खेळाडूंनी आपल्या पात्रतेचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

एसएआय बद्दल:

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य साध्य करणे ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी 'भारतीय क्रीडा प्राधिकरण' (एसएआय) कडे सोपवण्यात आली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासोबतच, युवकांमधील गुणवंत खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून, एसएआय ने भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एसएआयची संपूर्ण देशभरातील विविध प्रादेशिक केंद्रे आणि प्रशिक्षण केंद्रांमार्फत या योजनांची अंमलबजावणी  केली जाते.

 

* * *

(स्रोत – भारतीय क्रीडा प्राधिकरण) | पीआयबी मुंबई | आशिष सांगळे/ मंजिरी गानू /दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2287744) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English