दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया पोस्ट, मुंबई विभागाकडून शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये तीन आठवड्यांसाठी आधार मोबाईल अपडेट मोहीम सुरू

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 7:18PM by PIB Mumbai

मुंबई,21 जुलै 2026

आधार सेवांचा अविरत लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने, इंडिया पोस्टच्या मुंबई विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये तीन आठवड्यांसाठी आधार मोबाईल अपडेट (एमबीयु) मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 20 जुलै 2026 रोजी सुरू झाली असून,त्याअंतर्गत विशेष मोबाईल बायोमेट्रिक अपडेट (MBU) युनिट्सचा वापर केला जातो आहे.

शैक्षणिक संस्थांमध्येच आधारशी संबंधित आवश्यक सेवा उपलब्ध करून देऊन, विशेषतः विद्यार्थी आणि युवा नागरिकांसाठी आधार नोंदणी व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट्सची प्रक्रिया सुलभ करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पालक आणि बालकांसाठी ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर, सुलभ आणि त्रासमुक्त व्हावी, अशा प्रकारे या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत, सुरक्षित डिजिटल उपकरणांनी सज्ज असलेल्या इंडिया पोस्टच्या अधिकृत कर्मचाऱ्यांमार्फत नागरिक बायोमेट्रिक अपडेट्स, जनसांख्यिकीय माहितीतील सुधारणा आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे यांसारख्या विविध आधार-संबंधित सेवांचा लाभ घेऊ शकतात. नागरिकांच्या दारापर्यंत आवश्यक सरकारी सेवा पोहोचवण्याचे इंडिया पोस्टचे निरंतर प्रयत्न, हा उपक्रम अधोरेखित करत आहे.

याप्रसंगी बोलताना इंडिया पोस्ट, मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल काया अरोरा म्हणाल्या की ही मोहीम इंडिया पोस्टची एक विश्वासार्ह सेवा प्रदाता आणि भारताच्या डिजिटल प्रशासन व्यवस्थेतील एक प्रमुख भागीदार म्हणून विकसित होत असलेली भूमिका दाखवत आहे. त्या म्हणाल्या की आपल्या विस्तृत नेटवर्कचा आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अर्थात अंतिम घटकापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेचा वापर करून, इंडिया पोस्ट सेवांमधील तफावत दूर करत आहे आणि ओळखीशी संबंधित महत्त्वपूर्ण सेवा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतील, याची खात्री करत आहे.

आधार मोबाईल अपडेट मोहिमेला शाळा, पालक आणि स्थानिक समुदायांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. अशा जनसंपर्क उपक्रमांद्वारे, इंडिया पोस्ट सुरक्षित, संरक्षित, सरकार-मान्य आणि नागरिक-स्नेही सेवा प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे, तसेच डिजिटल समावेशनाच्या ध्येयामध्ये योगदान देत आहे.

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287345) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English