पंतप्रधान कार्यालय
प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि दृढ प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
17 JUL 2026 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि दृढ प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित समाजमाध्यमांवर सामायिक केले.
"प्रभूतं कार्यमल्पं वा यन्नरः कर्तुमिच्छति।
सर्वारम्भेण तत् कार्यं सिंहादेकं प्रचक्षते।।"
भारताला पहिली हायड्रोजन ट्रेन मिळण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारत आहे. स्वच्छ, हरित आणि भविष्याभिमुख वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या देशाच्या प्रयत्नांतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या उल्लेखनीय यशाशी संबंधित असलेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी 'एक्स'वरील आपल्या संदेशात म्हटले आहे:
"आज भारताला पहिली हायड्रोजन ट्रेन मिळण्याचे स्वप्न साकार होत आहे. आत्मनिर्भर भारत आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या कामगिरीशी संबंधित सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
प्रभूतं कार्यमल्पं वा यन्नरः कर्तुमिच्छति।
सर्वारम्भेण तत् कार्यं सिंहादेकं प्रचक्षते।।
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2285757)
अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam