दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहकांनी रोख रहित व्यवहाराच्या साधनांचा अधिकाधिक वापर करण्याचे टपाल विभागाचे आवाहन

Posted On: 16 JUL 2026 3:37PM by PIB Mumbai

 

टपाल खात्याच्या गोवा विभागाने, लोकांना आर्थिक व्यवहारांसाठी गोव्यातल्या सर्व टपाल कार्यालयात उपलब्ध डिजिटल टपाल सेवांचा उपयोग  करत  डिजिटल साधनांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश, डिजिटल इंडिया ला प्रोत्साहन देणे आणि जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर अशा सार्वजनिक सेवा उपलब्ध करुन देणे, हा आहे. 

ग्राहकांनी स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट आणि पार्सल बुकिंग, यासारख्या टपाल सेवांसाठी यूपीआय, क्यू आर कोड, डेबिट/क्रेडिट कार्ड अशा वित्तीय सेवांचा उपयोग करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. डिजिटल पेमेंट मुळे व्यवहार जलद होतात, व्यवहार पूर्ण झाल्याची पडताळणी त्वरित होऊ शकते, प्रत्येक ठिकाणी रोख पैसे नेण्याची गरज नसते, सुरक्षित आणि  पारदर्शक व्यवहार होऊ शकतात. 

राज्यभरातील सर्व पोस्टमास्टर आणि टपाल अधिकाऱ्यांना, ग्राहकांना डिजिटल पेमेंट पद्धती समजावून त्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टपाल विभाग गोव्याच्या लोकांना, कार्यक्षम, सुरक्षित आणि तंत्रज्ञान स्नेही टपाल सेवा देण्यास कटिबद्ध आहे. 

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2285394) अभ्यागत कक्ष : 49
Read this releasein: English