ऊर्जा मंत्रालय
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत, एनटीपीसीकडून, 19 आरोग्यसेवा वाहने गोवा सरकारला सुपूर्द
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2026 7:27PM by PIB Mumbai
मुंबई, 14 जुलै 2026
एनटीपीसी लिमिटेड च्या पश्चिम विभाग-1 च्या मुंबईतील मुख्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात, त्यांनी, सीएसआर म्हणजेच कॉर्पोरेट सामाजिक उतररदायित्व उपक्रमाअंतर्गत, 19 आरोग्यसेवा वाहने गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडे सुपूर्द केली. राज्यभरात, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुधारण्यात मदत म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.
केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, एनटीपीसी पश्चिम विभाग-1 च्या प्रादेशिक मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख वंदना चतुर्वेदी, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश तिवारी, गोव्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. रूपा नाईक, तसेच आरोग्य विभाग आणि गोवा सीएसआर प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही वाहने सुपूर्द करण्यात आली.
श्रीपाद नाईक यांनी, सीएसआर उपक्रमाअंतर्गत, एनटीपीसीने राष्ट्रबांधणीत दिलेल्या या योगदानाची यावेळी प्रशंसा केली. गोव्यातील आरोग्यक्षेत्राला पाठबळ देण्यासाठी त्यांनी एनटीपीसीचे आभार मानले. जनतेला उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी, तिथल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट असणे आवश्यक आहे, असे नाईक यावेळी म्हणाले.
गोवा भारतातले एक प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने तिथले नागरिक आणि पर्यटक या दोघांनाही उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम व कार्यक्षम आरोग्य व्यवस्था आवश्यक आहे, असे विश्वजित राणे यावेळी म्हणाले. राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक बळकट करण्यासाठी गोवा सरकारला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी एनटीपीसी पश्चिम विभाग-1 चे कौतुक केले. ही नवीन वाहने, राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एनटीपीसी आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे समाजाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वंदना चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या. आरोग्यसेवेसह, शिक्षण आणि शाश्वत उपजीविका ही एनटीपीसीच्या सीएसआर उपक्रमांची प्रमुख प्राधान्य क्षेत्रे असून, समाजात सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम घडवून आणणाऱ्या उपक्रमांना पाठबळ देण्याची कंपनीची कटिबद्धता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
आरोग्यसेवेसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात पुढील वाहनांचा समावेश आहे:
- 6 जीवन रक्षक रुग्णवाहिका (BLS)
- 8 अत्याधुनिक जीवन रक्षक रुग्णवाहिका (ALS)
- 2 हृदरोग रुग्णांसाठी रुग्णवाहिका
- 3 औषधे वाहक व्हॅन्स
या 19 आरोग्यसेवा वाहनांच्या समावेशामुळे गोव्यातील आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम होईल, रुग्णवाहतूक सेवा अधिक प्रभावी होईल आणि औषधांच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा होईल. परिणामी, राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत मिळेल.





* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284621)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English