श्रम आणि रोजगार मंत्रालय
'विश्वास 2026' योजनेत दंडाच्या प्रलंबित प्रकरणांत सामोपचाराने निपटारा : आयुक्त लोकेश गुप्ता
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2026 6:09PM by PIB Mumbai
पुणे, 13 जुलै 2026
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने कलम 14 ब अंतर्गत दंडाच्या प्रलंबित प्रकरणांचा जलद व सामोपचाराने निपटारा करण्यासाठी 'विश्वास-2026' ही विशेष योजना लागू केली असून, तिचा नियोक्त्त्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन न्यायालयातील दंडाची प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावीत, असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त-1 लोकेश गुप्ता यांनी केले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 9 जुलै 2026 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी अधिनियम, 1952या कलम 14 ब तसेच सामाजिक सुरक्षा संहिता, 2020या कलम 128 अंतर्गत दंड (नुकसानभरपाई) प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना 29 जूनपासून सहा महिने कालावधीसाठी लागू राहणार आहे.
योजनेअंतर्गत न्यायालयीन वादाची प्रकरणे, अंतिम आदेश झाल्यानंतरही वसुली न झालेली प्रकरणे, नोटीस बजावण्यात आलेली पण अंतिम आदेश न झालेली प्रकरणे तसेच अद्याप नोटीस न बजावलेली प्रकरणे पात्र ठरणार आहेत. 14 जून 2024 पूर्वीच्या प्रकरणांसाठी दंडात सवलतीची विशेष तरतूद करण्यात आली असून, विलंबाच्या कालावधीनुसार दरमहा 0.25 टक्के, 0.50 टक्के आणि एक टक्का दराने नुक्सानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी व्याजाची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक असून, तडजोडीनंतर संबंधित प्रकरणात कोणत्याही न्यायिक मंचासमोर पुढील अपील करणार नसल्याचे हमीपत्र नियोक्त्याने सादर करावे लागणार आहे. पूर्ण वसुली झालेली, फसवणूक, अपहार अथवा नोंदींमध्ये जाणीवपूर्वक
फेरफार असलेली तसेच व्याजाची संपूर्ण रक्कम न भरलेली प्रकरणे य योजनेतून वगळण्यात आली आहेत नियोक्त्यांनी EPFO च्या नियोक्ता पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून डिजिटल स्वाक्षर किंवा ई-साइनद्वारे अर्ज सादर करावेत संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत पडताळर्ण व मंजुरीनंतर मंजुरी प्रमाणपत्र नियोक्त्याच्य लॉगइनवर उपलब्ध करून दिले जाईल तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात 'विश्वास कक्ष' व मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असून नियमित, साप्ताहिक व पाक्षिक आढाव्यासह कामगिरी निर्देशांकांच्या आधारे प्रगतीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
'विश्वास-2026' योजनेमुळे कलम 14 ब अंतर्गत प्रलंबित दंडाच्या प्रकरणांचा जलद आणि सामोपचाराने निपटारा होऊन नियोत्ते व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना य दोघांनाही दिलासा मिळणार असल्याचे आयुक्त श्री. लोकेश गुप्ता यांनी कळविले आहे.
विश्वास - 2026 योजनेची वैशिष्ट्ये
- सहा महिन्यांसाठी विशेष सवलत योजना.
- न्यायालयीन व प्रलंबित दंडप्रकरणांचा सामोपचाराने निपटारा.
- व्याजाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच अर्ज ग्राह्य.
- दंडात विलंबानुसार सवलतीचे दर लागू.
- फसवणूक, अपहार व पूर्ण वसुली झालेली प्रकरणे योजनेबाहेर.
- ऑनलाइन अर्ज, पडताळणीनंतर मंजुरी प्रमाणपत्र उपलब्ध.
* * *
पीआयबी पुणे | हर्षल आकुडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284213)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English