लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

संविधानविषयक संयुक्त समितीने एक राष्ट्र, एक निवडणूक या विषयावर आमदार आणि इतर संबंधित घटकांसोबतची गोव्यातील बैठका केल्या पूर्ण

Posted On: 11 JUL 2026 8:33PM by PIB Mumbai

गोवा, 11 जुलै 2026

 

देशात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाची तपासणी करणाऱ्या, एकशे एकोणतीसवी घटनादुरुस्ती विधेयक, 2024' आणि 'केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2024 वरील संविधानविषयक संयुक्त समितीने, गोव्यातील आपला अभ्यास दौरा शनिवारी पूर्ण केला. या दौऱ्यादरम्यान समितीने आमदार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांशी दोन दिवस सविस्तर चर्चा केली.

दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात गोवा विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षांच्या आमदारांशी झालेल्या चर्चांनी झाली. या चर्चेत प्रस्तावित विधेयकांमधील तरतुदींसह अनेक घटनात्मक आणि निवडणूक-विषयक मुद्द्यांचा समावेश होता; यामध्ये मध्यावधी निवडणुका, मुदतपूर्व विधानसभा बरखास्त झाल्यास उर्वरित कार्यकाळाचे काय होणार, भारतीय निवडणूक आयोगाचे प्रस्तावित अधिकार आणि संघराज्यवाद व संविधानाची मूलभूत संरचना  यांसारखी घटनात्मक तत्त्वांचा समावेश होता.

त्यानंतर समितीने ओएनजीसी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेड आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. या संस्थांच्या उच्चपदस्थ अग्रगण्य अधिकाऱ्यांनी एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाबाबत आपली मते मांडली आणि त्यांच्या भूमिकेला पाठबळ देणारी आकडेवारी सादर केली.

समितीच्या सदस्यांनी या सार्वजनिक उपक्रमांकडून अधिक स्पष्टीकरण मागितले आणि एकाच वेळी निवडणुका घेतल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामांचे अधिक सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त अभ्यास करण्यास त्यांना प्रोत्साहित केले.

गोव्यातील आपल्या दौऱ्याच्या अखेरीस, समितीने स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सहभागींनी एक राष्ट्र, एक निवडणूक या प्रस्तावावर आपली मते मांडली, यामुळे या विषयाच्या विविध पैलूंवर विचारांची अभ्यासपूर्ण देवाणघेवाण झाली.

एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी प्रस्तावित, घटनात्मक आणि कायदेशीर आराखड्याबाबतच्या देशव्यापी चर्चासत्रांचा भाग म्हणून, समिती आता आपल्या पुढच्या अभ्यास दौऱ्यासाठी लखनौला रवाना होईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2283764) अभ्यागत कक्ष : 55
Read this releasein: English