सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

श्रवणदोषांवर परवडणाऱ्या दरात उपचारांच्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगजन संस्था (AYJNISHD) आणि 'क्षम इनोव्हेशन' यांच्यात सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 11 JUL 2026 7:00PM by PIB Mumbai

मुंबई, 11 जुलै 2026

 

अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगजन संस्था (AYJNISHD), मुंबई आणि क्षम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी अत्याधुनिक सहाय्यक तंत्रज्ञान विकसित करणे, त्याचे संशोधन आणि वैद्यकीय प्रमाणीकरण करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

या सहकार्यांतर्गत वैद्यकीय चाचण्या आणि संशोधन करणे, नाविन्यपूर्ण श्रवण-सहाय्यक उत्पादनांचे प्रमाणीकरण करणे आणि भारतात परवडणारी तसेच सर्वांसाठी सुलभ अशी श्रवण-चाचणी व उपचार  परिसंस्था विकसित करण्यावर प्रामुख्याने भर दिला जाईल. या भागीदारीमुळे वापरकर्त्यांच्या गरजांचा विचार करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासाला गती मिळेल आणि वैद्यकीय तसेच पुनर्वसन क्षेत्रात त्यांचा प्रभावी वापर करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

या सामंजस्य करारावर, अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगजन संस्था, मुंबईचे संचालक डॉ. सुमन कुमार आणि क्षम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतीक रघुवंशी यांनी स्वाक्षरी केली. यावेळी अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या श्रवणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवराज भिमटे आणि क्षम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे  ग्रीशम शर्मा उपस्थित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283723) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English