कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुनरुद्धारित खाण जमिनीवर व्यावसायिक बांबू लागवडीसाठी डब्ल्यूसीएल-एमबीडीबी दरम्यान चौथ्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 10 JUL 2026 6:38PM by PIB Mumbai

नागपूर, 10 जुलै 2026

 

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (डब्ल्यूसीएल) बल्लारपूर परिसरातील धुपतला खुल्या खाणीतील 28 हेक्टर पुनरुद्धारित खाण जमिनीवर व्यावसायिक बांबू लागवड करण्यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळासोबत (एमबीडीबी) आपला चौथा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. हा उपक्रम शाश्वत खाणकाम, पर्यावरण संवर्धन आणि कोळशाव्यतिरिक्त इतर महसूल स्रोतांच्या विविधीकरणाप्रती डब्ल्यूसीएलची वचनबद्धता अधिक दृढ करतो.

डब्ल्यूसीएलचे सीएमडी आणि संचालक (तांत्रिक) डॉ. हेमंत शरद पांडे आणि एमबीडीबीचे व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश रंजन यांनी डब्ल्यूसीएलचे संचालक (वित्त) आणि संचालक (एचआर) बिक्रम घोष आणि संचालक (तांत्रिक – प्रकल्प आणि नियोजन) एस. एस. परांजपे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे डब्ल्यूसीएलमधील व्यावसायिक बांबू लागवडीखालील एकूण क्षेत्राने 121 हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे. धुपतला प्रकल्पामध्ये 28 हेक्टर क्षेत्राचा समावेश असेल.यापैकी 26 हेक्टरवर व्यावसायिक बांबू आणि 2 हेक्टरवर जांभूळ व अर्जुन यांसारख्या देशी प्रजातींच्या लागवडीसह एकूण 31,108 रोपांची लागवड केली जाईल. डब्ल्यूसीएल पहिल्या पाच वर्षांत अंदाजे ₹ 2.57 कोटींची गुंतवणूक करेल तर एमबीडीबी लागवड, देखभाल, कापणी आणि विपणनाची जबाबदारी घेईल.

15 वर्षांच्या या प्रकल्पातून आठव्या वर्षापर्यंत गुंतवणुकीची परतफेड अपेक्षित आहे. महसूल वाटणी प्रारूपानुसार, डब्ल्यूसीएलला निव्वळ नफ्यापैकी 85 टक्के तर एमबीडीबीला सुविधा शुल्क म्हणून 15 टक्के मिळतील.

कोळशाव्यतिरिक्त उत्पन्नाचा एक शाश्वत स्रोत निर्माण करण्याबरोबरच या उपक्रमामुळे पर्यावरणीय पुनर्संचयन, कार्बन साठवण, मृदा संवर्धन, जैवविविधता वृद्धी तसेच स्थानिक समुदायांसाठी, विशेषतः प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2283429) अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein: English