परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
11 जुलै 2026 रोजी पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके), पुणे येथे सामान्य आणि तात्काळ अर्जदारांसाठी, तर पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके), सोलापूर येथे सामान्य अर्जदारांसाठी विशेष पासपोर्ट मोहीम आयोजित केली जाणार
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2026 6:19PM by PIB Mumbai
पुणे, 10 जुलै 2026
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (आरपीओ) पुणे, सामान्य आणि तात्काळ श्रेणीतील अर्जदारांसाठी विशेष पासपोर्ट मोहीम आयोजित करत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. पासपोर्ट (पारपत्र) साठीची अपॉइंटमेंट लवकर उपलब्ध करून देणे आणि तातडीच्या प्रवासाची आवश्यकता असलेल्या नागरिकांना पारपत्र सेवा अधिक चांगल्या प्रकारे पुरवणे, हे याचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम शनिवार, 11 जुलै 2026 रोजी पुणे आणि सोलापूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवर राबवली जाईल.
सामान्य पासपोर्ट श्रेणीसाठी अर्जदारांना पासपोर्ट नियमांतर्गत नमूद केलेली संपूर्ण आणि अचूक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांना असे सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी पासपोर्ट इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि भेटीच्या दिवशी होणारा त्रास टाळण्यासाठी कागदपत्रांची पर्याप्तता आणि पात्रता सुनिश्चित करावी. अपूर्ण अथवा चुकीची कागदपत्रे असतील, तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
तात्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता आहे, तसेच त्याच्या पात्रतेसाठीचे नियम अधिक कठोर आहेत. अनेक अर्जदार एक अथवा दोन्ही निकष पूर्ण करू शकत नाहीत, आणि त्यामुळे यशस्वीपणे अर्ज सादर करू शकत नाहीत. अर्जदारांनी तात्काळ बाबत मार्गदर्शक सूचना आणि पूर्ततेच्या अटी काळजीपूर्वक वाचाव्यात, तसेच भेटीच्या दिवशी कोणत्याही संभाव्य समस्या उद्भवू नयेत, यासाठी कागदपत्रांची पुरेशी उपलब्धता आणि पात्रता सुनिश्चित करावी अशी विनंती करण्यात येत आहे. तात्काळ अंतर्गत अपात्र श्रेणींबद्दल जाणून घेण्यासाठी,
कृपया येथे भेट द्या: https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports.
(अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 5 अन्वये, पासपोर्ट नियम 1980 च्या नियम 5 अनुसार, पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते, आणि अर्जाचा योग्य निपटारा करण्यासाठी पासपोर्ट प्राधिकरणाला आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे अर्जदाराकडून मागवू शकते.)
विशेष मोहिएत अपॉइंटमेंट (भेटीसाठी वेळ) कशी बुक करावी:
- पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) अथवा एमपासपोर्ट सेवा (mPassport Seva) ॲपला भेट द्या, आणि तात्काळ/सामान्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.
- ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर 'शेड्यूल अपॉइंटमेंट पेज' वर जाऊन 'पीएसके पुणे (नॉर्मल अँड तात्काळ) किंवा पीएसके सोलापूर (नॉर्मल)' हे स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉईंटमेंट बुक करा.
विशेष मोहिमेची तारीख आणि स्थान:
- दिनांक: 11 जुलै 2026 (शनिवार)
- स्थान: पीएसके पुणे आणि पीएसके सोलापूर
- श्रेणी: सामान्य आणि तात्काळ अपॉइंटमेंट्स (नवीन आणि पुनर्जारी)
- वेळ: सकाळी 09:00 ते संध्याकाळी 17:00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे)
* * *
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283390)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English