कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीआय-डीआरआयच्या संयुक्त कारवाईत वन्यजीव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 53 संरक्षित वन्यप्राणी आणि पक्ष्यांची सुटका, 06 आरोपींना अटक

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2026 8:07PM by PIB Mumbai

मुंबई, 9 जुलै 2026

केंद्रीय अन्वेषण विभाग आणि मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो मुंबई/कोलकाता यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करत 15 स्लो लोरिस, 2 बिंटुराँग, 28 स्टार कासवे, 6 इजिप्शियन गिधाडे आणि 2 शिक्रा पक्ष्यांची सुटका केली. हे सर्व प्राणी आणि पक्षी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या अनुसूची-1 मध्ये समाविष्ट असून, भारतात त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत संरक्षित वन्यजीवांच्या बेकायदा व्यापारात सहभागी असलेल्या आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीबाबत मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने विकसित केलेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील विविध ठिकाणी ही संयुक्त कारवाई करण्यात आली. सीबीआयने 7 आणि 8 जुलै 2026 रोजी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली असून, मुंबईमध्ये तीन आरोपींना आणि कोलकात्यामध्ये अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 मधील तरतुदी तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विविध भागांतून हे प्राणी आणि पक्षी मिळवून त्यांचा व्यापार करत होते. प्रारंभिक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जप्त करण्यात आलेले वन्यजीव सुरक्षित ताबा आणि पुढील देखभालीसाठी अनुक्रमे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही तपस संस्थांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.  या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2283043) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English