आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत 'नमस्ते (NAMASTE)' योजनेअंतर्गत, कचरा वेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि क्षयरोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 8:13PM by PIB Mumbai
मुंबई, 8 जुलै 2026
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत चेंबूर येथील ललित कला सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात 'नमस्ते (NAMASTE)' योजनेअंतर्गत, कचरा वेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि क्षयरोग जनजागृती मोहिमेचे उद्घाटन केले.
महाराष्ट्र लोक भवनने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सहयोगाने सुरू केलेल्या 'टीबी मुक्त मुंबई' अभियानाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राज्यपाल आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई) किटचे वाटप करण्यात आले.


यावेळी इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्सच्या उपाध्यक्ष सुशीला साबळे, नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे, बीएमसीच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवणगारे वर्मा, बीएमसीचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवारे, बीएमसीच्या उप महानगरपालिका आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. किरण दिघावकर आणि देवनार परिसरातील कचरा वेचक महिला कर्मचारी उपस्थित होते.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282606)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English