गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनडीआरएफ अकादमी, नागपूर द्वारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) शैक्षणिक कार्यक्रमांबाबत जनजागृती सत्राचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 03 JUL 2026 7:14PM by PIB Mumbai

 

इग्नू (IGNOU), अर्थात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नागपूर येथील प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. लक्ष्मण कुमारवाड यांनी एनडीआरएफ अकादमीमध्ये, इग्नूद्वारे उपलब्ध करून देण्यात येणारे विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि अध्ययनाच्या संधी, यांबाबत माहितीपूर्ण सत्र आयोजित केले होते.

या सत्रादरम्यान, डॉ. कुमारवाड यांनी 'इग्नू'च्या पदवी, पदव्युत्तर, पदविका, प्रमाणपत्र आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांची माहिती दिली, तसेच 'मुक्त आणि दूरस्थ शिक्षण' (ओडीएल) प्रणालीच्या लवचिकतेवर विशेष भर दिला. कार्यरत व्यावसायिक, गणवेशधारी कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये व्यत्यय न आणता दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यासाठी इग्नू कशा प्रकारे सक्षम करते हे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात अधिकारी, अभ्यासक्रमातील सहभागी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग नोंदवला, त्यांनी सक्रियपणे संवाद साधला आणि प्रवेश, अभ्यासक्रमाची निवड तसेच विद्यार्थी सहाय्य सेवांबाबत मार्गदर्शन मिळवले. यावेळी बोलताना डॉ. लक्ष्मण कुमारवाड म्हणाले, "प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दर्जेदार उच्च शिक्षण सहज उपलब्ध आणि लवचिक बनवण्यासाठी इग्नू वचनबद्ध आहे. आमचे कार्यक्रम आजीवन शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि व्यक्तींना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्यांची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक कौशल्ये वाढवायला सहाय्य करण्यासाठी डिझाइन केले आहेत."

उपस्थितांना संबोधित करताना, एनडीआरएफ अकादमीचे संचालक ब्रिगेडियर आर. सत्यनारायण यांनी सर्व अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना 'इग्नू' द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक संधींचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले . ते म्हणाले, "वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी निरंतर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी इग्नूच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी आणि 'आजीवन शिक्षण' हा त्यांच्या जीवनप्रवासाचा एक भाग बनवावा."

या सत्राची सांगता प्रश्नोत्तरांच्या संवादात्मक सत्राने झाली. या सत्रात सहभागींना इग्नूची प्रवेश प्रक्रिया, अध्ययनार्थी सहाय्य सेवा आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाने एनडीआरएफ समुदायामध्ये निरंतर शिक्षण आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2280908) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English