नौवहन मंत्रालय
मुरगाव बंदर प्राधिकरणाने ईग्रीन क्वांटासोबत केला धोरणात्मक क्वांटम तंत्रज्ञान करार
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2026 5:58PM by PIB Mumbai
भारतातील सागरी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मुरगाव बंदर प्राधिकरण आणि ईग्रीन क्वांटा यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर करून बंदरातील मालवाहतूक आणि मालपुरवठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी नवीन उपाय विकसित करणे आणि त्यांची प्रायोगिक चाचणी घेणे यासाठी 'स्ट्रॅटेजिक क्वांटम टेक्नॉलॉजी फॉर पोर्ट इनोव्हेशन' करार केला आहे.

एमपीए, वास्को येथे आज एका कार्यक्रमात या करारावर अधिकृतपणे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रसंगी एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार, एमपीएचे उपाध्यक्ष विनायक राव आणि ईग्रीन क्वांटाचे संस्थापक आणि संचालक डॉ. कुमार गौतम उपस्थित होते.
हे धोरणात्मक सहकार्य भारत सरकारच्या सागरमाला कार्यक्रम, पीएम गतिशक्ती आणि ग्रीन शिपिंग उपक्रमांसह राष्ट्रीय सागरी परिवर्तन मोहिमांशी सुसंगत आहे. मुरगाव बंदराच्या कार्यक्षेत्रात, प्रगत क्वांटम ऑप्टिमायझेशन अल्गोरिदम (क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित सर्वोत्तम उपाय शोधणारी प्रगत संगणकीय प्रणाली), एआय-चालित विश्लेषण आणि प्रेडिक्टिव्ह लॉजिस्टिक्स इंटेलिजन्सवर (मालवाहतूक आणि पुरवठा साखळीतील भविष्यातील गरजा, अडथळे किंवा हालचालींचा अंदाज घेणारी बुद्धिमान प्रणाली) संशोधन, रचना आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी यामुळे एक संयुक्त व्यवस्था तयार होणार आहे.
या करारानुसार, दोन्ही संस्था क्वांटम-आधारित जहाज वेळापत्रक प्रणाली, मालवाहतूक व्यवस्थापन सुसूत्रीकरण, प्रगत डेटा-चालित बंदर विश्लेषण,सागरी पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनवणे, विविध प्रणालींचे एकत्रीकरण करणे आणि आधुनिक तसेच हरित बंदरांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करतील.

या सहकार्याअंतर्गत मुरगाव बंदर प्राधिकरण समन्वय साधेल, आवश्यक असंवेदनशील कार्यात्मक डेटा उपलब्ध करून देईल आणि प्रायोगिक चाचण्यांना मदत करेल. तर ईग्रीन क्वांटा हा डेटा पूर्ण गोपनीयतेने वापरून, क्वांटम तंत्रज्ञानाच्या मदतीने कामकाज अधिक कार्यक्षम करणारी मॉडेल्स, विश्लेषणात्मक अभ्यास आणि चाचणीसाठी सिम्युलेशन प्रणाली विकसित करून त्यांचा वापर करेल.
या सहकार्यामुळे भारतातील क्वांटम-सक्षम आधुनिक बंदरांसाठी एक नवा मानदंड प्रस्थापित होणे अपेक्षित आहे. हे देशातील सागरी पायाभूत सुविधांना तंत्रज्ञानाने प्रगत, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याच्या प्रवासाला बळ देईल.
***
सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
Follow us on social media: PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(रिलीज़ आईडी: 2280870)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English