कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री राम नाथ ठाकूर यांच्याकडून पुण्यात 'खेत बचाओ अभियान' चा आढावा
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2026 7:38PM by PIB Mumbai
पुणे, 26 जून 2026:
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी शुक्रवारी (26 जून) पुण्यात 'खेत बचाओ अभियान'च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत अभियानाची सद्यस्थिती, विविध उपक्रमांची प्रगती आणि पुढील अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत विविध संस्थांचे अधिकारी, राज्य कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचविण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक सुनील बोरकर, ATARI चे संचालक डॉ. एस. के. रॉय यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अभियानाच्या अंमलबजावणीतील अनुभव, स्थानिक स्तरावरील अडचणी आणि त्यावरील उपाय यांचा आढावा घेण्यात आला. शाश्वत शेती, पीक संरक्षण आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्यामुळे शेती ओसाड बनते, त्याऐवजी सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यात यावी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे प्रतिपादन यावेळी राम नाथ ठाकूर यांनी केले.
तसेच महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामामुळे आपण प्रभावित झालो असून त्यांच्या प्रयत्नाने कृषी क्षेत्राचा विकास वेगाने होईल असेही त्यांनी म्हटले.
***
हर्षल अकुडे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278289)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English