सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
नागपूरमध्ये 29 जून रोजी 20 वा सांख्यिकी दिन होणार साजरा
Posted On:
26 JUN 2026 12:53PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत येणारे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारताच्या सांख्यिकीय विकासात आणि आर्थिक नियोजनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रख्यात सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रा. दिवंगत प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त 29 जून 2026 रोजी नागपूरमध्ये 20 वा सांख्यिकी दिन साजरा करणार आहे.
हा कार्यक्रम राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे विभागीय कार्यालय (समन्वय आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग), प्रादेशिक कार्यालय (क्षेत्रीय कार्य विभाग) आणि गृह सर्वेक्षण युनिट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम सकाळी 10:00 वाजता इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथील प्रशिक्षण सभागृहात आयोजित केला जाईल.
"प्रशासकीय डेटाची क्षमता उलगडणे," ही या वर्षीची संकल्पना, पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती आणि प्रशासनामध्ये प्रशासकीय डेटाचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एनएसओ, नागपूरचे उपमहासंचालक श्रीनिवास उप्पला भूषवतील, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा समुद्र प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.
राष्ट्रीय विकासात सांख्यिकीच्या भूमिकेबद्दल विद्यार्थी आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर, घोषवाक्य, भाषण, प्रश्नमंजुषा, शब्दकोडे आणि शब्दशोध स्पर्धा, तसेच सांख्यिकीच्या महत्त्वावर एक विशेष व्याख्यान आयोजित केले जाईल.
***
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2278261)
अभ्यागत कक्ष : 73