संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलासाठी,माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अत्याधुनिक अपतटीय गस्ती जहाजांच्या निर्मिती प्रकल्पाचा मुंबईत शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2026 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2026
भारतीय तटरक्षक दलासाठीच्या, अत्याधुनिक, नव्या पिढीच्या सहा अपतटीय गस्ती जहाजांपैकी चौथ्या जहाजाच्या निर्मिती प्रकल्पाची सुरुवात आज म्हणजेच, 25 जून 2026 रोजी, मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) इथे करण्यात आली. सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या धोरणाला अनुसरून, अत्याधुनिक मशीनरी आणि प्रणालीने सुसज्ज अशा या जहाजाची संरचना, विकास आणि बांधणी एमडीएल द्वारे करण्यात येत आहे.
LZCH.jpeg)
या कार्यक्रमाला तटरक्षक दल आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या एनजीओपीव्ही सहा जहाजांच्या बांधणीचा करार 20 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आला होता. आपली कार्यक्षमता आणि ताकद वाढवण्याच्या तटरक्षक दलाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, हा उपक्रम महत्वाचा ठरला असून, त्याद्वारे, भारताची सामरिक स्वायत्तता अधिक मजबूत होणार आहे.
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277952)
आगंतुक पटल : 22