दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'सांजाव' उत्सवाच्या निमित्ताने गोवा टपाल विभागातर्फे विशेष टपाल शिक्क्याचे अनावरण

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2026 7:04PM by PIB Mumbai

पणजी, 24 जून 2026

गोव्यातला, पावसाळ्यातील अत्यंत लोकप्रिय सणांपैकी एक असलेल्या 'सांजाव' (São João) उत्सवानिमित्त, गोवा टपाल विभागाने आज पणजी मधल्या फिलॅटेलिक ब्युरो इथे, एका विशेष टपाल शिक्क्याचे (कॅन्सलेशन)अनावरण केले. पणजीतल्या मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्तर दीपक भोवार यांच्या हस्ते आणि तिकीट संग्राहक आणि टपाल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले.

या टपाल शिक्क्यात या उत्सवाची विविध वैशिष्ट्य दाखवण्यात आली आहेत. ज्यात, उत्सवादरम्यान विहिरीत उड्या मारण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेचे प्रतिक असलेली पारंपारिक गोवा पद्धतीची विहीर, त्यात सहभागी झालेल्यांनी माळलेला फुलांचा ‘कोपेल’ आणि उत्सवाशी संबंधित असलेली त्या हंगामातील फळे यांचा समावेश आहे.

'सांजाव' (São João) हा सण दरवर्षी 24 जून रोजी, सेंट जॉन द बॅप्टीस्ट यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो. हा उत्सव, त्यातील जोशपूर्ण प्रथा आणि परंपरांसाठी ओळखला जातो. ज्यात, फुलांचे मुकुट, लोकगीते आणि पावसाळ्यात विहिरी आणि पाणवठ्यांमध्ये पारंपारिक पद्धतीने मारल्या जाणाऱ्या उड्यांचा समावेश आहे.

या विशेष टपाल शिक्क्याच्या माध्यमातून, गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे  जतन आणि त्याचा प्रचार करणे, या उत्सवाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच टपाल तिकीट संग्रहामध्ये अधिकाधिक लोकसहभाग वाढवणे हा उद्देश आहे. गोव्यातील सर्वात विविधरंगी आणि दीर्घकालीन सांस्कृतिक परंपरापैकी एक असलेल्या या उत्सवाचा हा चिरस्थायी बहुमान आहे. 


शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2277533) आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English