दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि गोवा दूरसंचार लेखा नियंत्रक कार्यालयाच्या वतीने औरंगाबाद येथे जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2026 7:00PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जून 2026

दळणवळण मंत्रालय आणि दूरसंचार विभागाअंतर्गत येणाऱ्या दूरसंचार लेखा नियंत्रकांच्या (CCA) महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयामार्फत, आज औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयात जनसंपर्क  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दूरसंचार लेखा नियंत्रक डॉक्टर सतीश झा यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालयांच्या महसूल पथकाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

परवाना करारातील नियामक आणि आर्थिक तरतुदींबद्दल, दूरसंचार परवाना धारकांमध्ये जागरूकता वाढवणे तसंच, दूरसंचार क्षेत्रातील विद्यमान आणि नव्याने समाविष्ट झालेल्या परवानाधारकासोबतचा संवाद आणि सहभाग अधिक दृढ करणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा उद्देश होता.

डॉक्टर सतीशचंद्र झा यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. दूरसंचार विभाग आणि दूरसंचार परवानाधारक यांच्यात पारदर्शकता, नियमांचं पालन आणि प्रभावी संवाद होण्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावतात असं त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. परवानाधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यावर भर देत, समस्यांचं निराकरण आणि नियम पालनासंबंधित बाबीसाठी दूरसंचार विभागाशी सक्रियपणे सहकार्य करण्यासाठी झा यांनी त्यांना प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमात महसूल विभागाच्या वतीने तपशीलवार  सादरीकरण करण्यात आले. यात, परवाना करार आणि त्याचे विविध पैलू, आर्थिक स्थिती, परवाना शुल्क भरण्याची पद्धत, मुल्यांकन थकबाकी, बँकेच्या हमीसाठीच्या आवश्यकता आणि सरस मंच या मुद्यांचा  होता. यावेळी सहभागींना, परवानाधारकांसाठी उपलब्ध असलेल्या  तक्रार निवारण यंत्रणा आणि इतर सुविधांविषयक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

दूरसंचार परवानाधारकांशी झालेली वैयक्तिक चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते. यामुळे परवानाधारकांना त्यांचं शंका निरसन करण्याची, कामे करताना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्याची आणि नियामक आवश्यकतांबाबत स्पष्टता मिळवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे विभाग आणि दूरसंचार  उद्योग यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत झाली.

 
शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2277528) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English