संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथे 1,100 हून अधिक अग्निवीरांचा भारतीय सैन्यात समावेश

प्रविष्टि तिथि: 23 JUN 2026 4:23PM by PIB Mumbai

नागपूर, 23 जून 2026

 

नागपूर येथील 'ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर'ने 20 जून 2026 (शनिवार) रोजी 'गार्ड्स अग्निवीर बॅच-08' साठी 'अटेस्टेशन परेड' आयोजित केली. हे संचलन  म्हणजे  1,107 अग्निवीरांनी त्यांचे लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून प्रशिक्षित सैनिक म्हणून भारतीय सैन्यात सामील झाल्याचे प्रतीक आहे.

'गुजरात उप क्षेत्र आणि उत्तर महाराष्ट्र मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल नवतेज एस. सोहल (एसएम) यांनी संचलनाची पाहणी केली आणि नव्याने समावेश झालेल्या सैनिकांशी संवाद साधला. उपस्थितांना संबोधित करताना  कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी 'अग्निवीरांचे ' कौतुक केले; तसेच शिस्त, नैपुण्य  आणि राष्ट्रसेवेची सर्वोच्च मानके कायम राखण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

'अटेस्टेशन परेड' (शपथविधी संचलन) हा सैनिकाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे; तो प्रशिक्षणार्थी ते भारतीय सैन्याचा पूर्णपणे प्रशिक्षित सदस्य बनण्याच्या वाटचालीचे प्रतीक आहे. रेजिमेंटल सेंटरमधील प्रशिक्षणादरम्यान अग्निवीरांनी आत्मसात केलेली अचूकता, शिस्त आणि लष्करी कौशल्ये याचे दर्शन घडवले.

आधुनिक लष्करी कारवायांमधील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम अशा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या खंबीर आणि व्यावसायिकदृष्ट्या कुशल सैनिकांना घडवण्याप्रती 'ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर'ची कटिबद्धता या कार्यक्रमातून दिसून आली.

'बॅच--08' चे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे भारतीय सैन्याला आणखी तरुण सैनिक मिळाले आहेत जे समर्पित भावनेने आणि सन्मानाने देशाची सेवा करण्यास सज्ज आहेत.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2277035) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English