विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर-नीरी यांच्या वतीने, महिला स्वयं सहायता गटांसाठी बांबू हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2026 10:34PM by PIB Mumbai

नागपूर, 16 जून 2026

सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) - नीरी (राष्ट्रीय अभियांत्रिकी पर्यावरण संशोधन संस्था), नागपूर यांच्या वतीने, महिला स्वयं सहायता गटांसाठी बांबूपासून  हस्तकलावस्तू बनवण्यासाठीच्या पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली. 16 जून ते 20 जून 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, "औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळसा जाळल्यानंतर निर्माण होणारी राख अर्थात फ्लाय अॅश वर वाढवलेल्या बांबूपासून, बांबू हस्तकलांच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरण" ही या प्रशिक्षण वर्गाची मध्यवर्ती संकल्पना आहे. CSIR-NEERIच्या  बांबू-आधारित पर्यावरण-पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाद्वारे (ERT) शाश्वत उपजीविका, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाला प्रोत्साहन देणे आहे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाचं उद्घाटन, कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुदीप राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी CSIR-NEERI चे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन होते. तसंच, घन आणि घातक कचरा व्यवस्थापन विभागाचे शास्त्रज्ञ आणि अध्यक्ष डॉ. महेंद्र पी. पाटील आणि केटीपीएसचे उपकार्यकारी अभियंता  प्रवीण बुटे हे देखील या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

बांबू-आधारित उपजीविका निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या CSIR-NEERI च्या प्रयत्नांची राणे यांनी याप्रसंगी बोलताना प्रशंसा केली; तसंच, वृद्धिंगत होत असलेल्या बांबू क्षेत्रात, उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केलं. पर्यावरण पुनर्संचयन, चक्राकार अर्थव्यवस्था, हवामानात होणारे बदल आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी नवीकरणीय संसाधन म्हणून असलेल्या बांबूमध्ये असलेल्या क्षमता डॉ. मोहन यांनी अधोरेखित केल्या.विशेषतः महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करताना, नापीक जमिनींचे पुनरुज्जीवन करण्यात बांबूच्या असलेल्या  भूमिकेवर डॉ. पाटील यांनी विशेष भर दिला. बुटे यांनी बचत गट सदस्यांच्या समर्पित वृत्तीचं कौतुक करत, त्यांना बाजारपेठेतील संभाव्यतेसह दर्जेदार हस्तकला तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉ.लाल सिंघ यांनी CSIR-NEERIच्या बांबू-आधारित ईआरटी उपक्रमांचा आढावा सादर केला आणि पर्यावरणाचं पुनरुज्जीवन  आणि उपजीविका निर्मितीमध्ये त्याचं असलेलं योगदान अधोरेखित केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत बांबूची कापणी, त्याची हाताळणी, त्यावरील प्रक्रिया, हस्तकला उत्पादने, मूल्यवर्धित उत्पादन विकास, उद्योजकता, बांबूचं ब्रँडीग, विपणन, आणि उत्पादन आरेखन आदी कौशल्ये शिकवण्यात येतील. राखेच्या पुनर्वापरातून  उपयोगी वस्तुंचं उत्पादन कसं घेता येऊ शकत, जे, तिथल्या स्थानिकांसाठी पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक अशा दोन्ही प्रकारे लाभदायक ठरते,  हेच या उपक्रमातून दिसून येते.


सोनाली काकडे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273813) आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English