पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
मागणी वाढूनही गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध: सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या
जूनच्या पूर्वार्धात पेट्रोलच्या विक्रीत 39% तर डिझेलच्या विक्रीत 67% वाढ; संपूर्ण गोव्यात अखंडित पुरवठा साखळीद्वारे पुरवठा नियमित सुरू
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2026 10:17PM by PIB Mumbai
गोवा, 11 जून 2026
संपूर्ण गोव्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांसारख्या अत्यावश्यक पेट्रोलियम उत्पादनांची उपलब्धता सामान्य आणि अखंडित असल्याची ग्वाही इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी जनतेला दिली आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये गोव्यातील किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सामान्य वाढीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. 1 ते 7 जून या कालावधीतील किरकोळ विक्रीतील जिल्हानिहाय वाढ खालीलप्रमाणे आहे:
|
State
|
District
|
Petrol – RETAIL (1st to 7th June)
|
HSD – RETAIL (1st to 7th June)
|
|
Goa
|
CY
|
LY
|
% Gro.
|
CY
|
LY
|
% Gro.
|
|
South Goa
|
2693
|
1932
|
39.4
|
2264
|
1295
|
74.8
|
|
North Goa
|
4075
|
2938
|
38.7
|
3932
|
2416
|
62.7
|
|
|
Total
|
6768
|
4870
|
39.0
|
6196
|
3711
|
67.0
|
टर्मिनल, डेपो आणि किरकोळ विक्री केंद्रांचा समावेश असलेली संपूर्ण इंधन पुरवठा साखळी कार्यक्षमतेने आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय कार्यरत आहे. इंधनाच्या साठ्यावर सतत लक्ष ठेवले जात असून सर्व ठिकाणी साठा पुन्हा भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. पुरवठा पथके, वाहतूक जाळे, टर्मिनल कामकाज आणि किरकोळ विक्री केंद्रे चोवीस तास कार्यरत आहेत, जेणेकरून बाजारपेठांमध्ये उत्पादनांची अखंड वाहतूक आणि वेळेवर साठा पुन्हा भरला जाईल. घरगुती ग्राहकांच्या एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिले जात असून तो राज्यभरात सर्वसामान्य आहे. सर्व ग्राहकांना अखंडित पुरवठा सुनिश्चित व्हावा , यादृष्टीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गोव्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी घाबरून जाऊन पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी किंवा साठेबाजी करू नये. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या राज्यभरातील सर्व ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आणि सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करत आहेत.
* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2271935)
आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English