अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे मुंबई इथले प्रादेशिक संकुल आणि पुणे इथले प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र यांच्यात क्षमता निर्मिती आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2026 7:52PM by PIB Mumbai

मुंबई, 8 जून 2026

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे मुंबई इथले प्रादेशिक संकुल आणि संरक्षण लेखा नियंत्रकाचे (प्रशिक्षण) आणि प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्यात प्रशिक्षण, क्षमता निर्मिती, संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण या क्षेत्रांमधील संस्थात्मक सहकार्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा स्थापित करण्याच्या उद्देशाने आज पुण्यात एका सामंजस्य करार करण्यात आला.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबई इथल्या प्रादेशिक संकुलाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर आणि संरक्षण लेखा नियंत्रक तसेच राष्ट्रीय संरक्षण वित्तीय व्यवस्थापन अकादमीचे संचालक आंदे पोशेट्टी (IDAS) यांनी दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी या सामंजस्य करारावर केली.

संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा, परस्परांच्या प्राध्यापकांची देवाणघेवाण, परस्पर सहकार्यपूर्ण संशोधन उपक्रम आणि पायाभूत सुविधा तसेच ज्ञान विषयक संसाधनांची देवाणघेवाण यांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून परस्परांचे शिक्षण आणि व्यावसायिक तज्ञतेच्या विकासाला चालना देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय प्रशासन, लेखापरीक्षण पद्धती, ई-गव्हर्नन्स आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमधील सक्षमतेला बळकटी देण्यासाठी डिझाइन केलेली प्रशिक्षणाची विशेष मॉड्युल्स आणि प्रमाणपत्र कार्यक्रम विकसित करण्यासाठी देखील ही भागीदारी उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी परस्परांशी संवाद साधला. आपल्या संवादातून त्यांनी प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आंतर संस्थात्मक सहकार्याचे महत्त्व अधोरेखीत केले. या भागीदारीमुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये आंतर-क्षेत्रीय शिक्षण आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

हा सामंजस्य करार परस्परांच्या संस्थात्मक क्षमतांना बळकटी देण्यासाठी तसेच सार्वजनिक सेवा वितरणात उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे मुंबई इथले प्रादेशिक संकुल तसेच, पुणे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र वचनबद्ध आहे. हा सामंजस्य करार त्यांच्या याच सामायिक वचनबद्धतेचे प्रतिक ठरला आहे. परस्परांची कौशल्य, अनुभव आणि प्रशिक्षण व्यवस्थेचा लाभ घेत, या दोन्ही संस्था एका कुशल, माहितीसंपन्न आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या नागरी सेवा व्यवस्था विकासित करण्याच्या प्रक्रियेत योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा करार 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल, तसेच हा करार सार्वजनिक प्रशासन, वित्तीय प्रशासन आणि क्षमता विकासातील उत्कृष्टतेला चालना देण्याच्या उद्देशाने सातत्याने सहकार्यपूर्ण  उपक्रम राबवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2270417) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English