परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्यावतीने 'ओपन हाऊस'च्या आयोजनामुळे पारपत्र अर्जदारांना मोठा दिलासा

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 8:21PM by PIB Mumbai

पुणे, 4 जून 2026

 

“नागरिको देवो भवः” या तत्त्वाने प्रेरित होऊन, प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आरपीओ), पुणे यांनी 3 जून 2026 रोजी पुण्यातील येथील बाणेर येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयात 'ओपन हाऊस'चे आयोजन केले होते. पारपत्राशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे आणि वेळेवर पारपत्र जारी होण्यास मदत करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

पारपत्र अर्जांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. आरपीओ पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्जदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अनेक प्रलंबित प्रकरणांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी मदत केली.

या सत्रादरम्यान, अर्जदारांना पारपत्र अर्जांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती, न्यायालयीन कार्यवाही सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये पाळायची कार्यपद्धती, पत्ता बदलण्यासंबंधीचे मुद्दे इत्यादींबाबत सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले.

या ओपन हाऊसमुळे नागरिकांना पारपत्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याकरिता एक मौल्यवान व्यासपीठ मिळाले. यामुळे पारपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेतील विलंब कमी झाला आणि पारदर्शकता सुधारली.

प्रादेशिक पारपत्र कार्यालय, पुणे यांनी नागरिक-केंद्रित सेवा देण्याच्या तसेच पारपत्र अर्जांवर जलद आणि अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

यापुढील ओपन हाऊस 8 जुलै (बुधवार) 2026 रोजी दुपारी 2:00 ते 4:00 या वेळेत बाणेर येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयात आयोजित केले जाणार आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269065) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English