माहिती आणि प्रसारण मंत्रालय
नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा या संग्रहालयाला मे 2026 मध्ये 17 हजारांहून जास्त अभ्यागतांनी दिली भेट, मुंबईमधील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2026 3:05PM by PIB Mumbai
मुंबई, 4 जून 2026
केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) या स्थळाला मे 2026 मध्ये 17,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे. म्युझियमच्या इतिहासातील ही एका महिन्यातील सर्वाधिक पर्यटकसंख्या आहे.
भारताच्या चित्रपट क्षेत्रातील वारशाबद्दल जनतेमध्ये वाढणारी उत्सुकता आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी म्युझियमद्वारे सातत्याने केले जाणारे प्रयत्न यांचा हा परिणाम असल्याचे दिसत आहे. संपूर्ण महिन्यात कुटुंब, विद्यार्थी, चित्रपटप्रेमी आणि मुंबई दर्शन टूरवरील पर्यटकांनी मोठ्या संख्येने म्युझियमला भेट दिली. पर्यटकांनी म्युझियममधील जागतिक दर्जाच्या गॅलरींना भेट देऊन दुर्मिळ जुनी चित्रपट उपकरणे, ऐतिहासिक स्मृतिचिन्हे आणि परस्परसंवादी मल्टीमीडिया प्रदर्शने यांची पाहणी केली. एका शतकाहून अधिक काळातील भारतीय सिनेमाचा प्रवास यातून प्रदर्शित होत होता. भारताची मनोरंजन राजधानी असलेल्या मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये NMIC ने आपले एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे, असे या प्रतिसादातून स्पष्ट होत आहे.

ही कामगिरी भारतीय सिनेमाचे अखंड आकर्षण अधोरेखित करत आहे आणि देशाचा समृद्ध चित्रपट वारसा जतन करण्याच्या तसेच त्याचा गौरव करण्याच्या महत्त्वावर भर देत आहे," असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन आणि NMIC चे उपमहाव्यवस्थापक तसेच म्युझियम क्युरेटर सत्यजित मांडले यांच्या नेतृत्वाखालील म्युझियमच्या मुख्य टीमने या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. म्युझियमच्या टीमने व्यापक संपर्क मोहिमा राबवल्या. शैक्षणिक संस्था, संघटना, टूर ऑपरेटर्स आणि इतर भागधारकांशी सक्रिय समन्वय साधून, म्युझियमने आपली ओळख लक्षणीयरीत्या वाढवली आणि मुंबई तसेच मुंबईबाहेरील लोकांच्या सामूहिक भेटींना प्रोत्साहन दिले.

भारतीय चित्रपट वारशासाठी समर्पित असलेली भारतातील अतिशय प्रतिष्ठित संस्था म्हणून, NMIC हे देशातील एकमेव असे म्युझियम आहे जे मूकपटांच्या युगापासून ते आजतागायत भारतीय सिनेमाचा प्रवास सर्वसमावेशकपणे मांडते आणि पर्यटकांना एक अनोखा व मंत्रमुग्ध करणारा सांस्कृतिक अनुभव देते.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2268878)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English