परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिनांक 6 जून 2026 रोजी, पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), पुणे येथे सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी विशेष पारपत्र मोहीम

प्रविष्टि तिथि: 02 JUN 2026 3:45PM by PIB Mumbai

पुणे, 2 जून 2026

 

नागरिकांना पारपत्रासाठी नियोजित वेळ लवकर मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पारपत्र सेवांच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातील 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही मोहीम, शनिवारी, 6 जून 2026 रोजी,  पुण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रात राबवण्यात येणार आहे.

ज्या पारपत्र अर्जदारांनी 'सामान्य' श्रेणीअंतर्गत अर्ज केला असेल, त्यांनी पारपत्र नियमांनुसार विहित केलेली,  पूर्ण आणि योग्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. दिलेल्या नियोजित वेळेच्या दिवशी गैरसोय होऊ नये यासाठी, अर्जदारांनी 'पासपोर्ट इंडिया'च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, आणि आपल्याकडे आवश्यक आणि पर्याप्त कागदपत्रे आहेत हे सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कागदपत्रे  अपूर्ण किंवा चुकीची असल्यास, अर्ज स्वीकारला न जाण्याची शक्यता असते.

'तत्काळ' श्रेणीअंतर्गत काही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते, तसंच, पात्रतेचे निकष अधिक कठोर आहेत. बरेच अर्जदार यांतील एक किंवा दोन्ही निकष पूर्ण करण्यात अयशस्वी होतात, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही. अर्जदारांना विनंती आहे की त्यांनी, 'तत्काळ' श्रेणीसाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि हमीपत्र काळजीपूर्वक वाचावे तसेच नियोजित वेळेच्या दिवशी कोणतीही संभाव्य अडचण उद्भवू नये यासाठी आपल्याकडे आवश्यक आणि पर्याप्त कागदपत्रे आहेत हे सुनिश्चित करावे. 'तत्काळ' श्रेणीत अपात्र ठरणाऱ्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्या :

https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports

[अर्जदाराची सत्यता पडताळून पाहण्यासाठी, 'पारपत्र अधिनियम, 1967' चे कलम 5 (जे 'पारपत्र नियम, 1980' च्या नियम 5 सह वाचले जाते) असे विहित करते की, अर्जाचा योग्य निपटारा करण्याच्या उद्देशाने, पारपत्र प्राधिकरण, आवश्यक वाटेल अशी सर्व चौकशी करू शकते; तसेच, पारपत्र प्राधिकरणाला आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याची मागणी अर्जदाराकडे करू शकते.]

या विशेष मोहिमेसाठी नियोजित वेळ कशी घ्यावी :

  1. पासपोर्ट इंडिया च्या (https://www.passportindia.gov.in) या संकेतस्थळावर किंवा mPassport   Seva  या अॅप वर, 'तत्काळ' अथवा 'सामान्य' श्रेणी अंतर्गत आपला अर्ज सादर  करा.
  2. पैशांचा ऑनलाईन भरणा केल्यानंतर 'schedule appointment' पेज वर जाऊन, 'PSK Pune स्थळ निवडा, आणि तुम्हाला हव्या असेल त्या विशिष्ट दिवसासाठी नियोजित वेळ घेऊन टाका.

या विशेष मोहिमेच्या तारखा आणि स्थळांचा तपशील :

  1. तारीख : 6 जून 2026 (शनिवार)
  2. स्थळ : माउंट क्लेर बिल्डींग, स. नंबर 134/1, पार्ट एम्प पी -1, कमर्शिअल, 1ला मजला, ऑफिस नंबर 101 आणि 102, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे - 411021
  3. श्रेणी: सामान्य आणि तत्काळ साठी नियोजित वेळा (नवीन आणि पुन्हा जारी करण्यासाठी)
  4. वेळ : सकाळी 9 ते संध्याकाळी 5 (अर्जदारांनी, ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे)

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2267989) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English