पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा राज्यात इंधन पुरवठा सुरळीत आणि स्थिर


मे-2026 मध्ये गोव्यातील सार्वजनिक क्षेत्रातील किरकोळ विक्री केंद्रांवर इंधनाच्या विक्रीत वाढ

प्रविष्टि तिथि: 01 JUN 2026 6:58PM by PIB Mumbai

गोवा, 1 जून 2026

 

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थिच्या पार्श्वभूमीवरही संपूर्ण गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा अखंड उपलब्ध राहील, असे आश्वासन ग्राहकांना दिले आहे.

मे 2026 मध्ये गोव्यातील सार्वजनिक क्षेत्रातील किरकोळ विक्री केंद्रांवर मागील वर्षाच्या तुलनेत इंधनाची विक्री वाढली आहे. उत्तर गोव्यात पेट्रोल विक्री 6.9% तर दक्षिण गोव्यात 9.4% ने वाढली आहे. याच काळात डिझेल विक्रीत उत्तर गोव्यात 11.6% तर दक्षिण गोव्यात 15.0% वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून अधिकृत किरकोळ विक्री केंद्रांमधून खरेदी करण्याकडे वाढलेल्या कलामुळे झाली आहे.

तेल कंपन्या (OMCs) आपले टर्मिनल्स, डेपो, पाइपलाइन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट्स आणि रिटेल आउटलेट्सच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे इंधनाचा अखंड पुरवठा उपलब्ध करून देत आहेत. उत्पादनांची सुरळीत वाहतूक आणि वेळेवर पुनर्भरण राखण्यासाठी पुरवठा पथके आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अहोरात्र कार्यरत आहेत.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोलियम उत्पादनांचा काळाबाजार, अनधिकृत साठा आणि गैरवापर यांविरुद्ध कठोर कारवाई करावी असा सल्ला भारत सरकारने दिला आहे. ग्राहकांनी नेहमीप्रमाणे खरेदी सुरू ठेवावी आणि घाबरून खरेदी करणे टाळावे सल्लाही देण्यात आला आहे.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना इंधनाच्या उपलब्धतेबाबतच्या माहितीसाठी केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहनही सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पुन्हा केले आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2267639) आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English