अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर विभागातर्फे 'प्रारंभ-2026'अंतर्गत पुणे आणि ठाणे विभागांमध्ये व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 26 MAY 2026 3:46PM by PIB Mumbai

पुणे, 26 मे 2026

प्रारंभ-2026 अंतर्गत देशव्यापी जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राप्तिकर विभागाने नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 मधील तरतुदींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्याच्या सुरळीत व प्रभावी अंमलबजावणीला मदत करण्यासाठी पुणे, ठाणे आणि कल्याणमध्ये विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले.

हे जनजागृती कार्यक्रम पुणे आणि ठाणे विभागांच्या विविध विभागांमार्फत आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रधान प्राप्तिकर आयुक्त-2, पुणे; प्रधान प्राप्तिकर आयुक्त-3, पुणे; आणि प्रधान प्राप्तिकर आयुक्त-1, ठाणे यांच्या कार्यालयांचा समावेश होता. या कार्यक्रमांमध्ये करदाते, पगारदार कर्मचारी, सनदी लेखापाल, कर व्यावसायिक, उद्योग प्रतिनिधी, व्यापारी संघटना, सहकारी बँका आणि इतर भागधारकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

पुणे, येरवडा येथील जीएसटी भवनमध्ये, पुणे येथील प्रधान प्राप्तिकर आयुक्त-2 यांच्या अंतर्गत रेंज-3, पुणे द्वारे पगारदार शासकीय कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणारा एक विशेष संपर्क कार्यक्रम 20 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या राज्य जीएसटी विभागाचे 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या सत्रात कर आकारणी, विवरणपत्र भरणे, वजावट, सूट, करदात्यांसाठी सेवा आणि सुधारित प्राप्तिकर पोर्टलचा वापर यासंबंधीच्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे जीएसटी सहआयुक्त गोघरे यांनी करदात्यांसाठी अनुकूल उपक्रम हाती घेतल्याबद्दल प्राप्तिकर विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

प्रधान प्राप्तिकर आयुक्त-2, पुणे यांच्या अंतर्गत रेंज-2, पुणे यांच्यामार्फत 22 मे 2026 रोजी पीएमटी बिल्डींग , स्वारगेट, पुणे येथे आणखी एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अधिकारक्षेत्रीय निर्धारण युनिटशी संबंधित तरतुदींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला करदाते, सनदी लेखापाल संघटनांचे प्रतिनिधी आणि व्यापारी संघटनांसह 60 हून अधिक सहभागी उपस्थित होते. त्यांनी करदात्यांच्या शिक्षण व जागृतीसाठी विभागाच्या सक्रिय प्रयत्नांचे कौतुक केले.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधान प्राप्तिकर आयुक्त-3, पुणे यांच्या कार्यालयाने रेंज-8, आकुर्डी मार्फत 22 मे 2026 रोजी निगडी येथील आयसीएआय भवन येथे एक जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील करदाते, सनदी लेखापाल, उद्योगांचे प्रतिनिधी, सराफ असोसिएशन आणि भागधारकांनी सहभाग घेतला. अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त, रेंज-8, पुणे यांनी भागधारकांमध्ये जागरूकता आणि ऐच्छिक अनुपालनाचे महत्त्व अधोरेखित करत स्वागतपर भाषण केले.

नवीन कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि मुख्य तरतुदी याविषयी विभागीय अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले. सनदी लेखापाल ऋषी लोढा यांनी प्रमुख अतिथी या नात्याने व्याख्यान दिले आणि नवीन कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित बाबींबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन मांडला. आयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखा आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींनीही विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रधान आयकर आयुक्त-1 ठाणे, यांच्या कार्यालयाने  21 मे 2026 रोजी आदित्य बँक्वेट हॉल, अशर आयटी पार्क, ठाणे पश्चिम येथे एक मोठा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात 350 हून अधिक करदाते आणि संबंधित गटांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यात ठाणे चेंबर ऑफ कॉमर्स, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयकर सल्लागार, सराफ संघटना, सहकारी बँका आणि वैयक्तिक करदाते यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान, ठाण्याचे आयकर सहआयुक्त (लेखा परीक्षण  युनिट) मधुकर आनंद, आणि सनदी लेखापाल विमल पुनामिया आणि विजय जोशी यांनी नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 मधील महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट करणारे सर्वसमावेशक सादरीकरण केले. या सादरीकरणात प्रामुख्याने नवीन कायद्यांतर्गत आणलेली 'कर वर्ष' संकल्पनेची ओळख, विवरणपत्र भरण्याची चौकट, टीडीएस/टीसीएस बाबत तरतुदी, कर लेखापरीक्षणाची आवश्यकता, संक्रमणकालीन तरतुदी आणि सुलभतेचे उपाय यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी परस्परसंवादी चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या सत्रांचाही समावेश होता.

प्रधान आयकर आयुक्त- 1, ठाणे यांच्या कार्यालयाद्वारे 22 मे 2026 रोजी बी.के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कल्याण येथे ' प्रारंभ -2026 (PRARAMBH-2026)’ अंतर्गत आणखी एक जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात करदाते, सनदी लेखापाल, कर सल्लागार आणि गोदामे, दागिने आणि औषध निर्माण यासारख्या क्षेत्रातील 100 हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग होता. यावेळी नवीन कायद्याची ठळक वैशिष्ट्ये, करदात्यांच्या सोयीसाठीच्या उपाययोजना आणि अनुपालनाशी संबंधित कार्यपद्धती, यावर सविस्तर सादरीकरणे करण्यात आली. सनदी लेखापाल विमल पुनामिया यांनीही आपले विचार मांडले आणि कर कायद्यांचे सुलभीकरण आणि सुसूत्रीकरण करण्याच्या सरकारच्या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली.

सर्व कार्यक्रमांमध्ये, सहभागींना आयकर विभागाच्या नवीन पोर्टलचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच 'प्रारंभ-2026 (PRARAMBH-2026) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या करदात्यांच्या  सुविधाविषयक उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये 'कर साथी' हा आयकर वेबसाइटवर चोवीस तास उपलब्ध असलेला एआय-सक्षम चॅटबॉट, 'कर सेतू' हा एक सर्वसमावेशक मार्गदर्शन आणि संदर्भ मंच, आणि नवीन कायदा समजून घेणे सोपे जावे आणि स्वयंस्फूर्त अनुपालनाला चालना मिळावी यासाठी डिझाइन केलेली 'संवाद' ही परस्परसंवादी शिक्षण सत्रे, याचा समावेश होता.

'प्रारंभ-2026 अंतर्गत, आयकर विभागाच्या एका व्यापक उद्दिष्टाचा भाग म्हणून हे जनसंपर्क उपक्रम राबवले जात असून, सुलभ, विश्वासावर आधारित आणि तंत्रज्ञान-चालित कर प्रणालीच्या दृष्टीकोनाला अनुसरून, जनजागृती, पारदर्शकता, लाभधारकांचा सहभाग आणि करदाता-केंद्रित प्रशासनाला चालना देणे, हे याचे उद्दिष्ट आहे.जागरूकता वाढवल्याबद्दल आणि नवीन 'आयकर कायदा, 2025' च्या दिशेने होणारे संक्रमण अधिक सुलभ केल्याबद्दल, सहभागींनी आणि लाभधारकांनी या कार्यक्रमांची प्रशंसा केली. 

 

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2265412) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English