श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्यामार्फत 'विवाद से विश्वास' योजनेअंतर्गत जनजागृती आणि सुविधांसाठी बुधवारी विशेष मोहिमेचे आयोजन

Posted On: 26 MAY 2026 12:02PM by PIB Mumbai

पुणे, 26 मे 2026

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ईपीएफओ म्हणजेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या, पुण्याच्या प्रादेशिक कार्यालयाने, निष्क्रिय ईपीएफ खात्यांमधून, पैसे ग्राहकांच्या इतर खात्यात जमा करण्यासाठीची विशेष जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे सदस्यांना सामाजिक सुरक्षा निधीचे लाभ वेळेत मिळतील, हे सुनिश्चित केले जात आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) कामगार, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि नियोक्ते यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी "निधी आपके निकट 2.0" (NAN 2.0) हा जिल्हास्तरीय संपर्क कार्यक्रम आयोजित करत आहे. या उपक्रमादरम्यान, जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एक पथक कर्मचारी आणि नियोक्ते यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करते. तपशील खालीलप्रमाणे आहे:

NAN 2.0 ची तारीख आणि वेळ

अधिकाऱ्यांची टीम

कार्यक्रम स्थळ

 

27/05/2026

 

सकाळी 10.00 ते दुपारी 04.00

श्री एन. रमेश, प्र.अ./ ले.अ., नोडल अधिकारी

 

मे. आयटीसी लिमिटेड, रांजणगाव, पुणे

श्री विशाल प्रभाकर शेरे, प्र.अ./ ले.अ.

श्रीमती स्मिता सूर्यवंशी, प्र.अ /ले.अ.

श्री संदीप कुमार बर्नवाल, अ.प. 

या कार्यक्रमात प्रामुख्याने 'विवाद से विश्वास' योजनेविषयी जागरूकता आणि सुलभता यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तथापि, याव्यतिरिक्त, कोणत्याही समस्यांना तोंड देत असलेल्या कोणत्याही सदस्याला, निवृत्तीवेतनधारकाला किंवा नियोक्त्याला त्यांच्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे. तसेच, ज्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन देणे थांबवले आहे किंवा ज्यांच्या जीवन प्रमाणपत्रांची मुदत संपत आहे, त्यांना त्यांचे डीएलसी (DLC) अद्ययावत करण्यासाठी या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे, जेणेकरून त्यांना त्यांचे निवृत्तीवेतन सुरळीत आणि अखंडपणे मिळत राहील. उपरोक्त शिबिरात, वर नमूद केलेल्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एक समर्पित पथक या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित असेल.

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, प्रभारी अधिकारी लोकेश गुप्ता यांनी सांगितले, "ईपीएफओच्या, यूएनएन आधारित सेवा, आधार पडताळणी आणि बँक खाते सीडिंग अशा डिजिटल सुविधांसह आम्ही निश्चित लोकांशी संपर्क साधून त्यांना विनासायास आपले दावे निकाली काढता येतील, यांसातही मदत करतो आहोत.”

***

HarshalAkude / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2265298) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English