महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' (पीएमआरबीपी) - 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन
शौर्य, क्रीडा, नवोन्मेष, समाजसेवा आणि इतर क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत बालकांचा केला जाणार गौरव;ऑनलाइन नामांकनासाठी 31 जुलै अंतिम मुदत
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2026 7:00PM by PIB Mumbai
पणजी/गोवा: 25 मे, 2026
केंद्राच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या , प्रतिष्ठित 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' ( पीएमआरबीपी) 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार देशातील ज्या बालकांनी अतुलनीय कामगिरी केली आहे, त्यांचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. ज्या बालकांनी कौतुकास्पद कामगिरी केली आणि त्याचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडला आहे, तसेच इतरांना प्रेरणा दिली आहे, अशा गुणवंत बालकांचा या पुरस्काराने सत्कार केला जातो.
हा पुरस्कार शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या सहा श्रेणींमध्ये दिला जातो. गुणवान आणि लोकहितदक्ष बालकांचा सन्मान सरकारकडून केला जातो.
ज्या बालकांचे वय दिनांक 31 जुलै, 2026 रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांनी वरील सहापैकी कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून असामान्य कार्य केले तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे, अशी बालके या पुरस्कारासाठी नामांकनास पात्र असतात.
निवड प्रक्रिया व्यापक आणि सर्वसमावेशक असावी यासाठी, सरकारच्या विविध मंत्रालयांकडून आणि विभाग, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि इतर संबंधित संस्थांकडून नामांकने मागवण्यात आली आहेत. पीएमआरबीपी -2026 साठीची नामांकने आणि शिफारसी केवळ https://awards.gov.in या 'राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल'द्वारेच ऑनलाइन स्वीकारण्यात येतात.
ज्या गुणवंत बालकांनी अतुलनीय कामगिरी केली असूनही, त्यांना सहसा लोकांचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळत नाही, अशा पात्र बालकांना शोधून काढण्यावर मंत्रालयाने विशेष भर दिला आहे. या पुरस्कारासाठी कन्या , समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी ) आणि दिव्यांग व्यक्तींमधील गुणवान बालकांना शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीएमआरबीपी -2026 साठीची ऑनलाइन नामांकन प्रक्रिया 1 एप्रिल, 2026 रोजी सुरू झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै,2026 ही आहे.
पात्र व्यक्ती आणि संस्थांनी, विहित मुदतीमध्ये 'राष्ट्रीय बाल पुरस्कार पोर्टल'द्वारे आपली नामांकने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
Follow us on Social Media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2265091)
आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English