माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने, प्रेस कौन्सिल कायदा, 1978 मधील कलम 5(3) (क) अंतर्गत 15 व्या कार्यकाळाच्या पुनर्रचनेसाठी, वृत्त संस्थांचे व्यवस्थापन करणाऱ्या पात्र व्यक्तींच्या संघटनांकडून/स्वतः वृत्तसंस्थेकडून दावे आमंत्रित केले, यासाठीची शेवटची तारीख: 19 जून 2026

Posted On: 22 MAY 2026 2:35PM by PIB Mumbai

गोवा, 22 मे 2026

 

प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया हे वैधानिक निम-न्यायिक प्राधिकरण असून प्रेस कौन्सिल कायदा, 1978 या संसदेने संमत केलेल्या कायद्यान्वये त्याची स्थापना करण्यात आली. भारतातील वृत्त संस्थांच्या स्वातंत्र्याचे जतन करणे तसेच या वृत्त संस्थांचा दर्जा टिकवणे आणि त्यात अधिक सुधारणा करणे यासाठीची तरतूद या कायद्यान्वये करण्यात आली.

दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचा 14 वा कार्यकाळ संपुष्टात आला. 15 व्या कार्यकाळासाठी या कौन्सिलची पुनर्रचना करण्याकरिता दिनांक 09.06.2024 रोजी जारी केलेल्या जाहिरातवजा नोटीसीद्वारे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने प्रेस कौन्सिल कायदा, 1978 मधील कलम 5(3) (क) अंतर्गत दावे आमंत्रित केले. मात्र, 5(3) (क) अंतर्गत कोणतेही दावे सादर करण्यात आले नाहीत.

आता, कौन्सिलच्या अध्यक्षांनी प्रेस कौन्सिल (व्यक्तींच्या संस्थांच्या अधिसूचनेसाठीची प्रक्रिया) नियमांसह सदर कायद्याच्या कलम 5(4) अन्वये, संपूर्ण देशभरातील वृत्त संस्थांचे व्यवस्थापन करणाऱ्या पात्र व्यक्तींच्या संघटनांकडून/स्वतः वृत्तसंस्थेकडून प्रेस कौन्सिल कायदा, 1978 मधील कलम 5 (3) (क) अंतर्गत अधिकृत राजपत्रात अधिसूचित करण्यासाठी दावे आमंत्रित केले आहेत. यासाठीच्या दाव्यांचे सीलबंद पाकिटातील अर्ज दिनांक 19 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांकडे पोहोचले पाहिजेत. यासंदर्भातील जाहिरात, संपूर्ण देशभरातील वृत्तपत्रांमध्ये दिनांक 17.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर जाहिरात कौन्सिलच्या https://www.presscouncil.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/संजना चिटणी/सदर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264067) अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein: English