ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी पश्चिम विभाग-I च्या सखी महिला समितीने मुंबईतील वृद्धाश्रमाला भेट दिली

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 9:35PM by PIB Mumbai

मुंबई, 21 मे 2026

 

एनटीपीसी पश्चिम विभाग-I मुख्यालय, मुंबईचा महिला क्लब, सखी महिला समितीने, सामाजिक कल्याण आणि समाजसेवेप्रती आपली वचनबद्धता जपत, मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील 'लिटल सिस्टर्स ऑफ द पुअर 'या वृद्धाश्रमाला भेट दिली.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, संस्थेतील वृद्ध रहिवाशांसाठी साधारण 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्य दान करण्यात आले. वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची देखभाल, आधार आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे हा या भेटीचा उद्देश होता.

या कल्याणकारी उपक्रमासाठी वंदना चतुर्वेदी, प्रादेशिक मनुष्यबळ प्रमुख (पश्चिम-1), यांच्यासमवेत सखी महिला समितीच्या अध्यक्ष सरोजा फणी कुमार; उपाध्यक्ष  चालंतिका सामल; ज्येष्ठ सदस्या हुमा सय्यद; महासचिव  मंजुषा शर्मा; आणि समितीच्या इतर सदस्यांनी पुढाकार घेतला.

सखी महिला समिती समाजाच्या हितासाठी नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम आणि कल्याणकारी कार्ये हाती घेतात. यातून एनटीपीसी पश्चिम-1 च्या सर्वसमावेशक विकास, करुणा आणि सामाजिक जबाबदारीवरील निरंतर भर दिसून येतो.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263950) आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English