अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘कुरिअर पद्धतीद्वारे एसईझेड मंजुरींच्या स्वयंचलनाचे विश्लेषण’ या विषयावर मुंबईत परिसंवाद आणि वेबिनार आयोजित

प्रविष्टि तिथि: 14 MAY 2026 10:25PM by PIB Mumbai

मुंबई, 14 मे 2026

मुंबईतील करदाता सेवा महासंचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने प्रणाली महासंचालनालयाच्या पश्चिम विभागीय युनिटच्या सहकार्याने 14 मे 2026 रोजी ‘कुरिअर पद्धतीद्वारे एसईझेड मंजुरींच्या स्वयंचलनाचे विश्लेषण( डिकोडिंग ऑटोमेशन)’ या विषयावर संमिश्र पद्धतीचा परिसंवाद आणि वेबिनार आयोजित केला. हा कार्यक्रम मुंबईतल्या बॅलार्ड इस्टेट इथल्या नवीन सीमाशुल्क भवनाच्या परिषद कक्षात पार पडला.

या कार्यक्रमात कुरिअर पद्धतीद्वारे आयात-निर्यात मंजुरींच्या स्वयंचलनाशी संबंधित सुधारणांवर भर देण्यात आला. या स्वयंचलित प्रणालीमुळे मालवाहतुकीच्या मंजुरीची प्रक्रिया जलद होणे, कागदपत्रांचा वापर कमी होणे, प्रतीक्षा कालावधी कमी होणे, प्रत्यक्ष वेळेतील दृश्यमानता वाढणे, त्रुटी कमी होणे आणि व्यापार सुलभतेला चालना मिळणे अपेक्षित आहे. तसेच, या उपक्रमामुळे इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, यंत्रसामग्री, वाहन घटक, वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती आणि इतर तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांमध्ये सीमापार ई-कॉमर्स आणि बीटूसी प्रकाराच्या निर्यातीलाही चालना मिळणार आहे.

करदाता सेवा महासंचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी स्वागतपर भाषण करताना करदाता जनजागृती, हितधारकांशी संवाद आणि अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क प्रक्रियांबाबत माहिती प्रसारामध्ये महासंचालनालयाची भूमिका अधोरेखित केली. प्रणाली महासंचालनालयाने 29 आणि 30 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या सूचनांद्वारे सुरू केलेला हा स्वयंचलन उपक्रम, डिजिटल सीमाशुल्क प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होणे, पारदर्शकता वाढणे आणि प्रक्रिया गतिमान होणे साध्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

एकात्मिक ECCS–ICEGATE–ICES प्रणालीमुळे एसईझेड कुरिअर मंजुरी प्रक्रियेत कार्यक्षमता, पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभता वाढणार आहे, तसेच सर्व संबंधित घटकांमध्ये सुसूत्र समन्वय साधला जाणार आहे, असे प्रणाली महासंचालनालयाच्या पश्चिम विभागीय युनिटचे अतिरिक्त महासंचालक मनीष थपलियाल यांनी सांगितले.

डीएचएल एक्स्प्रेसचे नियामक व्यवहार प्रमुख वासुदेवन राजगोपालन (वसु) यांनीही व्यापार सुलभता, पुरवठा कार्यप्रणाली आणि स्वयंचलनामुळे कार्यक्षमता व आंतरराष्ट्रीय व्यापारातली स्पर्धात्मकता कशी वाढते याबाबत आपले अनुभव मांडले.


शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2261265) आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English