कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक

Posted On: 14 MAY 2026 9:39PM by PIB Mumbai

मुंबई, 14 मे 2026

नीट-यूजी (NEET-UG) 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणी, केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गेल्या 24 तासांत आणखी दोन आरोपींना अटक केली असून, देशभरात 14 ठिकाणी शोध मोहीम राबवली.

नीट-यूजी 2026 परीक्षेच्या आयोजनातील अनियमिततेबाबत शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारावर, सीबीआयने 12 मे 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता.

यापूर्वी, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. यात जयपूर इथून तीन, गुरुग्राम मधून एक आणि नाशिक मध्ये अटक केलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. या पाचही आरोपींना आज दिल्ली मधील न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

12 मे 2026 रोजी सुरू केलेली आपली देशव्यापी मोहीम पुढे नेत, सीबीआयच्या विशेष पथकांनी गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एक, अशा आणखी दोन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

धनंजय लोखंडे, अहिल्यानगर

मनीषा वाघमारे, पुणे

इतर अनेक संशयित व्यक्तींची सध्या चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाशी संबंधित सर्व धागेदोरे तपासले जात असून, सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सीबीआयने म्हटले आहे.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2261254) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English