शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'युवा संगम'च्या सहाव्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार: सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचे बळकटीकरण

Posted On: 14 MAY 2026 9:27PM by PIB Mumbai

पुणे, 14 मे 2026 

युवा संगम हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' (EBSB) या उपक्रमांतर्गत एक प्रमुख कार्यक्रम आहे. देशभरातील युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक आदान-प्रदान आणि अनुभवात्मक शिक्षणाला चालना देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमाच्या सध्या सुरू असलेल्या सहाव्या टप्प्यादरम्यान, सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी भारतातील राज्यांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची जोडी आंध्र प्रदेश राज्यासोबत जोडलेली असून असून, आयआयएसईआर पुणे आणि आयआयटी तिरुपती यांना या दोन राज्यांमधून नोडल संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमाचा एक भाग म्हणून, 15 मे 2026 पासून, महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ शैक्षणिक आणि सांस्कृतिक अनुभवासाठी आंध्र प्रदेशला भेट देत असून, त्यांचे यजमानपद आयआयटी तिरुपती भूषवणार आहे. नंतर, जून 2026 मध्ये, संपूर्ण आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्राला भेट देणार असून, त्यांचे यजमानपद आयआयएसईआर पुणे (IISER Pune) भूषवेल.

या महाराष्ट्र शिष्टमंडळात पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रमांमधील सुमारे 50 विद्यार्थी, तसेच 30 वर्षांखालील कॅम्पसबाहेरील तरुणांचा समावेश आहे. हे प्रतिनिधी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आले असून, ते विज्ञान आणि अभियांत्रिकी, साहित्य, कायदा, राजकारण, अर्थशास्त्र आणि व्यवसाय प्रशासन यांसारख्या विविध शैक्षणिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात. ते आज आयआयएसईआर पुणे येथे एकत्र आले असून, 15 मे 2026 रोजी तिरुपतीला पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवासाला निघतील.

दिनांक 14 मे 2026 रोजी, आयआयएसईआर पुणेच्या समन्वय पथकाने एक अभिविन्यास सत्र आयोजित केले; या सत्रानंतर एका औपचारिक प्रस्थान समारंभाचे आयोजन करण्यात आले, ज्याद्वारे या प्रवासाच्या सुरुवातीची घोषणा करण्यात आली. या प्रस्थान समारंभास आयआयएसईआर पुणे आणि AICTE येथील मान्यवर उपस्थित होते; यामध्ये प्रा. सुनील भागवत (संचालक, आयआयएसईआर पुणे), डॉ. कनीनिका सिन्हा (आयआयएसईआर पुणे येथील प्राध्यापक व समन्वयक), आणि AICTE चे अधिकारी श्री. तरुण ककर व श्रीमती गरिमा रोहेला यांचा समावेश होता.

या उपक्रमाबद्दल बोलताना, आयआयएसईआर पुणेचे संचालक, प्राध्यापक सुनील भागवत म्हणाले:

“युवा संगम तरुण विद्यार्थ्यांना भारताच्या विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देते. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आणि एक विज्ञान संस्था म्हणून, आयआयएसईआर पुणेला शैक्षणिक आदान-प्रदान आणि सांस्कृतिक अनुभवासह या कार्यक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे. विद्यार्थी भारताच्या विविधतेतील एकतेची अधिक सखोल समज विकसित करतात आणि राष्ट्रीय एकात्मतेचे राजदूत म्हणून उदयास येतात. तरुण सहभागींना वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सामावून घेतल्याने, मला खात्री आहे की यामुळे भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील तयारीत भर पडेल.”

हा कार्यक्रम राष्ट्रउभारणी, नवोपक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक सलोख्यामध्ये युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन 'विक्सित भारत 2047' च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

युवा संगमच्या प्रवासातील अद्ययावत माहिती, छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे अनुभव आणि व्हिडिओ सहभागी संस्था, तसेच युवा संगम आणि एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांच्या अधिकृत वेबसाइट्स आणि सोशल मीडिया पेजेसद्वारे उपलब्ध करून दिले जातील.

पीआयबी पुणे | हर्षल आकुदे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2261242) अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein: English