शिक्षण मंत्रालय
मातृदिन- 2026 निमित्त आयआयएम मुंबईने केली ‘तेजस्विनी उपक्रमा’ची घोषणा
महिला नेतृत्व, उद्योजकता, संशोधन आणि सर्वसमावेशकतेला चालना देणारा राष्ट्रीय महिला सशक्तीकरण उपक्रम
Posted On:
08 MAY 2026 7:46PM by PIB Mumbai
मुंबई, 8 मे 2026
मातृदिन- 2026 निमित्त, 8 मे 2026 रोजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (आयआयएम मुंबई) ने महिलांचे नेतृत्व, उद्योजकता, धोरण संशोधन, सर्वसमावेशकता आणि शैक्षणिक संधी यांना चालना देण्याच्या उद्देशाने ‘तेजस्विनी उपक्रम’ सुरू करण्याची घोषणा केली.
मातृदिनानिमित्त सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, समाजातील पहिल्या शिक्षिका, संस्था-निर्मात्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या म्हणून महिलांच्या भूमिकेला मान्यता देणारा आहे. तसेच विविध क्षेत्रांतील आणि समुदायांतील महिलांना सक्षम करणारी नेतृत्व आणि शिक्षण परिसंस्था निर्माण करण्याचे महत्त्वही यातून अधोरेखित करण्यात आले आहे.
R9TO.jpeg)
हा उपक्रम व्यवस्थापन शिक्षण, नवोन्मेष आणि संस्थात्मक प्रभावाद्वारे महिलांसाठी दीर्घकालीन, संरचित संधी निर्माण करण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे आयआयएम मुंबईने सांगितले. ‘तेजस्विनी उपक्रमा’च्या पाच आयामांमध्ये विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती, तेजस्विनी राष्ट्रीय सन्मान, तेजस्विनी संस्थान पुरस्कार, संस्थात्मक प्रशासन तसेच विविधता, समानता आणि समावेशन आणि महिला नेतृत्वासाठी राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे.
“मातृदिनाच्या निमित्ताने, महिला-नेतृत्व, नवोपक्रम आणि समावेशन यांना बळकट करण्यासाठी समर्पित एक अर्थपूर्ण संस्थात्मक उपक्रम म्हणून ‘तेजस्विनी उपक्रम’ सुरू करताना आयआयएम मुंबईला अभिमान वाटत असल्याचे या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले. माता या समाजाच्या पहिल्या शिक्षिका, मार्गदर्शिका आणि निर्मात्या असतात. शिक्षण, उद्योजकता, धोरणात्मक सहभाग आणि नेतृत्व विकास यांद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याप्रती ही आमची वचनबद्धता आहे,” असेही ते म्हणाले.
तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये महिलांचे वर्णन "जगत जननी दामिनी दुति गता – म्हणजेच विश्वाची माता, जिचे अस्तित्व विजेप्रमाणे तेजस्वी आहे" असे केले आहे. ते तेज, ती तेजस्वी चमक, केवळ एक रूपक नसून वास्तवाचे एक सखोल वर्णन आहे. या देशातील महिलांनी नेहमीच हा प्रकाश आणि आंतरिक शक्ती मूर्त स्वरूपात धारण केली आहे. ‘तेजस्विनी उपक्रम’ हा त्या तेजाला साजेशी संस्थात्मक रचना उभारण्याच्या आयआयएम मुंबईच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
तेजस्विनी उपक्रमाच्या पाच आयामांमध्ये महिला व्यावसायिक आणि भावी नेतृत्वासाठी नेतृत्व विकास आणि कार्यकारी शिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यात धोरणात्मक नेतृत्व, उद्योजकता, व्यवस्थापकीय कौशल्य, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल समावेश यावर भर दिला जाणार आहे. हा उपक्रम धोरण आणि प्रशासन केंद्राच्या माध्यमातून संशोधन आणि धोरणात्मक आराखड्याला बळकट करणारा, तसेच धोरणपत्रे आणि क्षेत्रनिहाय अभ्यासांद्वारे महिला-नेतृत्वाखालील वाढ आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणारा आहे.
KYI8.jpeg)
उद्योजकता आणि इनक्यूबेशन सहाय्यांतर्गत, आयआयएम मुंबईचे सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्यूबेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप (सीआयआयई) शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये महिला-नेतृत्वाखालील स्टार्टअप्स आणि उद्योग निर्मितीला प्रोत्साहन देईल. हा उपक्रम अधिक समावेशक, आदरपूर्ण आणि सहाय्यक परिसंस्थेद्वारे संस्थात्मक प्रशासन तसेच विविधता, समानता आणि समावेशकता यांना अधिक बळकटी देणारा आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी गुणवत्ता-आणि-गरज शिष्यवृत्ती देखील सुरू करण्यात आली आहे. यामुळे व्यवस्थापन शिक्षण आणि नेतृत्वात त्यांचा सहभाग वाढेल. याव्यतिरिक्त, दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत — यामध्ये विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट महिला नेत्यांसाठी 'तेजस्विनी राष्ट्रीय सन्मान' तसेच आयआयएम मुंबईमधील महिला प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 'तेजस्विनी संस्थान पुरस्कार' यांचा समावेश आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259190)
अभ्यागत कक्ष : 61