कृषी मंत्रालय
आयसीएआर-सीसीएआरआय गोवा येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन “श्रमिक सन्मान दिवस 2026” म्हणून साजरा
Posted On:
04 MAY 2026 5:48PM by PIB Mumbai
पणजी, 4 मे 2026
आयसीएआर –केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था यांनी 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2026 ‘श्रमिक सन्मान दिवस’ म्हणून साजरा केला. या कार्यक्रमाद्वारे संस्थेच्या सर्व विभागांतील कामगारांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम ‘कार्यस्थळी निकोप मानसिक वातावरण सुनिश्चित करणे’ या वर्षीच्या संकल्पनेशी सुसंगत होता.
या कार्यक्रमात कुंभारजुआ मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई आणि उत्तर प्रदेशातील मिरगंज मतदारसंघाचे आमदार डॉ. डी. सी. वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून, तर गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम आणि गोव्याचे प्रादेशिक कामगार आयुक्त (केंद्रीय) हरिकेश बहादूर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी संस्थेच्या कामगारांसाठी सुरू असलेल्या कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. यामध्ये आरोग्य सेवा, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहाय्य आणि उच्च शिक्षणासाठी मदत यांचा समावेश आहे. संस्थेची प्रगती ही तिच्या मनुष्यबळाच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी संस्थेच्या संस्थेच्या विविध विभागांतील कामगारांचा त्यांच्या समर्पित सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. उन्हाळ्यात कामादरम्यान कामगारांच्या सुरक्षेसाठी पांढऱ्या टोप्यांचे वाटपही करण्यात आले. मान्यवरांनी संस्थेच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे कौतुक करत सहाय्यक आणि निरोगी कार्य वातावरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे समन्वयन फार्म अधीक्षक आणि नोडल अधिकारी (कंत्राटी कामगार) डॉ. विनोद ए. उबरहंडे आणि सहाय्यक सीटीओ राहुल एम. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात सुमारे 170 कामगार आणि कर्मचारी सहभागी झाले होते.


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257879)
अभ्यागत कक्ष : 33