सांस्कृतिक मंत्रालय
पारशिवनी इथे तीन दिवसीय “कुवारा भिवसेन महोत्सवा”चे आयोजन
Posted On:
17 APR 2026 7:22PM by PIB Mumbai
“कुवारा भिवसेन महोत्सव” हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव पारशिवनी मैदान, पारशिवनी, नागपूर इथे एप्रिल 18 ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज संध्याकाळी 7:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (एससीझेडसीसी), नागपूर आणि महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या सहयोगाने होत आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात तीन राज्यांतील सहा आदिवासी नृत्य गटांमधील 90 पेक्षा अधिक आदिवासी कलाकार सांस्कृतिक कला सादर करतील.
या कार्यक्रमात छत्तीसगडमधील सैला कर्मा आणि गेडी नृत्य; मध्य प्रदेशातील बैगा कर्मा, बैगा परधोनी आणि गुडुम बाजा; तसेच महाराष्ट्रातील तारपा, सौंगी मुखवटा नृत्य आणि खापरी नृत्य यांसारख्या प्रसिद्ध आदिवासी नृत्य प्रकारांचा समावेश असेल.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि प्रवेश मोफत आहे.
एससीझेडसीसी नागपूरच्या संचालक आस्था कार्लेकर यांच्यासह आयोजकांनी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आणि महोत्सवात सादर होणाऱ्या समृद्ध आदिवासी सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे.
***
नीलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2253175)
अभ्यागत कक्ष : 32