माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आकाशवाणी पणजीकडून नैमित्तिक तत्त्वावर कोकणी वृत्त निवेदकांसाठी निवड प्रक्रिया सुरु
Posted On:
16 APR 2026 4:16PM by PIB Mumbai
पणजी, 16 एप्रिल 2026
आकाशवाणी, पणजीने गोव्यात वास्तव्यास असलेल्या पात्र उमेदवारांकडून नैमित्तिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार या श्रेणीतील पॅनलसाठी अर्ज मागविले आहेत.
अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असावेत व त्यांचे वय 21 ते 50 वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी अर्जदाराला कोंकणी भाषेमध्ये प्राविण्य, तसेच इंग्रजी व कोंकणी या दोन्ही भाषांमध्ये प्रभावी अनुवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. उमेदवारांचा आवाज रेडिओ प्रसारणासाठी योग्य असावा. रेडिओ किंवा दूरदर्शन माध्यमातील पत्रकारितेचा अनुभव तसेच संगणकाच्या मूलभूत वापराचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.
उमेदवारांनी अर्जासोबत नॉन-रिफंडेबल अर्ज प्रक्रिया शुल्क डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धतीने भरावे. सामान्य प्रवर्गासाठी शुल्क रु. 354 तर SC, ST आणि OBC प्रवर्गासाठी रु. 266 आहे. हे शुल्क ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया रेडिओ, पणजी यांच्या खात्यात जमा करावे.
पूर्ण भरलेले अर्ज व पैसे भरल्याची छापील पावती, यांसह हेड ऑफ RNU, ऑल इंडिया रेडिओ, आल्तिन्हो, पणजी, गोवा– 403001 या पत्त्यावर पाठवावेत. लिफाफ्यावर “Application for the Post of CNRT” असे स्पष्ट नमूद करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 जून 2026, दुपारी 4 वाजेपर्यंत आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांची असून, यामध्ये लेखी परीक्षा व मुलाखत यांचा समावेश आहे. प्रत्येक टप्प्यास 100 गुण आहेत. लेखी परीक्षेत पत्रकारितेची समज, भाषिक कौशल्य, चालू घडामोडींचे ज्ञान तसेच अनुवाद कौशल्य यांचे मूल्यमापन केले जाईल. किमान 50 गुण मिळविणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील.
ही नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीची असून कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क देत नाही. निवड झालेल्या उमेदवारांना गरजेनुसार काम दिले जाईल व त्यांनी सर्व प्रकारचे व्यावसायिक निकष, तसेच ‘AIR ब्रॉडकास्ट कोड’चे पालन करणे अपेक्षित आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आकाशवाणी पणजीच्या वृत्त विभागाशी संपर्क साधावा.
Phone Number- 7020672710, Email: rnuairpanaji[at]gmail[dot]com

पीआयबी पणजी | नेहा कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2252631)
अभ्यागत कक्ष : 77