आयुष मंत्रालय
एआयआयए-आयसीएआयएनईची क्रांतिकारी कल्पनेच्या निवडीद्वारे एमएसएमई हॅकेथॉन 5.0 मध्ये उत्कृष्ट कामगिरी
Posted On:
15 APR 2026 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026
नवोपक्रम आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणून आपली वाढती ओळख अधोरेखित करीत, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआयआयए) ने आपल्या आयसीएआयएनई या इनक्युबेशन केंद्रामार्फत एमएसएमई आयडिया हॅकेथॉन 5.0 मध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला. आयुष मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत आयुर्वेद क्षेत्राच्या प्रगतीसाठी समर्पित असलेल्या एकमेव अग्रगण्य यजमान संस्थेची आपली भूमिका अधिक बळकट करीत, एआयआयएने पुन्हा एकदा राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत प्रभावी नवकल्पना ओळखण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि त्यांचा विस्तार करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे.
“एमएसएमई आयडिया हॅकेथॉन 5.0 मधील ही कामगिरी आयुर्वेद परिसंस्थेमध्ये नवोपक्रमाला चालना देण्याबाबत एआयआयएच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आयकेईनच्या माध्यमातून आम्ही केवळ नवकल्पनांना पाठबळ देत नाही तर; त्यांना प्रभावी आणि विस्तारक्षम उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ देखील निर्माण करीत आहोत. हे व्यासपीठ राष्ट्रीय विकास आणि जागतिक आरोग्य प्रगतीला हातभार लावते. ‘माइट आऊट’ची निवड पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक कल्पना यांचा संगम घडवून वास्तवातील समस्यांना सामोरे जाण्याच्या दृष्टीकोनाला आणखी बळ देते,” असे एआयआयएचे संचालक प्रा. पी. के. प्रजापती यांनी सांगितले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा उपक्रम असलेला एमएसएमई आयडिया हॅकेथॉन 5.0 हा विद्यार्थ्यांमध्ये, नवोन्मेषींमध्ये आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्समध्ये नवोपक्रम, उद्योजकता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक अग्रगण्य राष्ट्रीय मंच आहे. या मंचावर सहभागीांना सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सक्षम कल्पना सादर करण्याची संधी मिळते. निवडक नवकल्पनांना 15 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, तसेच देशातील मान्यताप्राप्त यजमान संस्थांमध्ये मार्गदर्शन आणि इनक्युबेशन पाठबळ दिले जाते.
एमएसएमई हॅकेथॉन उपक्रमाच्या सुरुवातीपासून नामांकित यजमान संस्थांपैकी एक म्हणून एआयआयए आयुर्वेद क्षेत्रात नवोपक्रमाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावित आहे.
उत्कृष्टतेप्रती सातत्यपूर्ण वचनबद्धतेसह एआयआयए, आयसीएआयएनईच्या माध्यमातून नवोपक्रमाचे ऊर्जाकेंद्र म्हणून उदयास येत आहे. कल्पनांना बळ देत, स्टार्टअप्सना सक्षम करीत आणि भारतातील आरोग्य सेवा व त्यांच्याशी संबंधित क्षेत्रांचे भविष्य घडवित आहे.
निलीमा चितळे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252390)
अभ्यागत कक्ष : 14