अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

भारतीय संघाला 15व्या ‘युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड’ (ईजीएमओ) 2026 मध्ये ऐतिहासिक यश


ईजीएमओमध्ये भारतीय स्पर्धकांनी जिंकली सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके

Posted On: 15 APR 2026 7:35PM by PIB Mumbai

मुंबई, 15 एप्रिल 2026

भारतीय संघाने 15 व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड (ईजीएमओ) 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ही स्पर्धा 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत फ्रान्समधील बोर्दो इथे आयोजित करण्यात आली होती. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी पदके पटकावली.

ऐतिहासिक कामगिरी करत, ईजीएमओमध्ये भारतीय स्पर्धकाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले असून, या  स्पर्धेत यंदा भारताने  आतापर्यंतची सर्वोत्तम सांघिक  कामगिरी केली आहे. भारतीय संघाने 67 सहभागी देशांपैकी 6वे स्थान पटकाविले. 2015 मध्ये ऑलिम्पियाडमध्ये पदार्पण केल्यापासून भारताची ही सर्वोच्च क्रमवारी आहे.

सहभांगीची नावे :

अनुक्रमांक

नाव

राज्य

पुरस्कार

1

श्रेया शंतनू मुंदडा

मुंबई, महाराष्ट्र

सुवर्ण पदक

2

संजना फिलो चॅको

केरळ

रौप्य पदक

3

शिवानी भारत कुमार

तमिळनाडू

कांस्य पदक

4

शिरमोई बेरा

कोलकाता

कांस्य पदक

Shreya Shantanu Mundhada from Mumbai won Gold

Sanjana Philo Chacko from Kerala won Silver Medal

Shivani Barath Kumar from Chennai Bronze Medal

भारतीय संघाचे नेतृत्व डॉ. वैदेही थत्ते (नेता), डॉ. मृदुल थत्ते (उपनेता) आणि अदिती मुठखोड (स्पर्धकांसोबत निरीक्षक) यांनी केले. विशेष म्हणजे, भारताने ईजीएमओसाठी संपूर्ण महिला संघ पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे.

ईजीएमओ 2026 च्या आवृत्तीत 67 देशांनी प्रतिनिधित्व केले. एकूण 260 विद्यार्थिंनींनी  सहभाग घेतला. यामध्ये 42 युरोपीय देशांमधील 161  सहभागींचा समावेश होता. भारत 2015 पासून या ऑलिम्पियाडमध्ये अतिथी राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे.

या उल्लेखनीय यशाचे श्रेय ईजीएमओ प्रशिक्षण शिबीर (ईजीएमओटीसी) अंतर्गत होणारे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दिल्या जाणाऱ्या सखोल प्रशिक्षणाला आहे. या कार्यक्रमाला माजी ऑलिम्पियन, अग्रगण्य गणित संशोधन संस्थांमधील संशोधक आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (एचबीसीएसई) यांचे सहाय्य असून, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएई) अंतर्गत राष्ट्रीय उच्च गणित मंडळ (एनबीएचएम) यांचे सातत्यपूर्ण पाठबळ आहे.

एचबीसीएसई-टीआयएफआर या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत एक प्रमुख स्वायत्त संस्थेची, देशभरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना निवडून आणि त्यांना प्रशिक्षण आणि  प्रोत्साहन देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही संस्था राष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा आयोजित करते. तसेच, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि खगोलशास्त्र या विषयांतील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी विद्यार्थ्यांना पद्धतशीर प्रशिक्षण देते.

सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2252341) अभ्यागत कक्ष : 57
Read this releasein: English