अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत 15 एप्रिल रोजी भारतीय महसूल सेवेच्या 78 व्या तुकडीचा प्रशिक्षण समापन समारंभ

Posted On: 13 APR 2026 4:48PM by PIB Mumbai

मुंबई, 13 एप्रिल 2026

 

नागपूर इथली राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी 15 एप्रिल 2026 रोजी भारतीय महसूल सेवेच्या 78 व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण समापन समारंभ आयोजित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा भारतीय महसूल सेवेच्या 78 व्या तुकडीतल्या 130 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या 16 महिन्यांच्या प्राथमिक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समाप्तीचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम कुशल आणि नैतिक कर प्रशासक घडवण्यात राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीची वचनबद्धता अधोरेखित करतो.

नागपूर इथली राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही आयकर विभागाच्या 'गट अ' अधिकाऱ्यांसाठीची एक अग्रगण्य प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था आधुनिक प्रशिक्षण आणि निवासी सुविधांनी सज्ज असून ती सर्वांगीण व्यावसायिक विकासाला पाठबळ देते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, हे प्रशिक्षणार्थी अधिकारी सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून आयकर विभागात समाविष्ट होतील आणि त्यांची देशभरात विविध ठिकाणी नियुक्ती केली जाईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251558) अभ्यागत कक्ष : 81
Read this releasein: English