युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संडेज ऑन सायकल या उपक्रमाच्या 69 व्या आवृत्तीचे नवी मुंबई येथे यशस्वी आयोजन


फिट इंडिया संडेज ऑन सायकल चळवळीत 400 हुन अधिक युवा नेत्यांनी घेतला सहभाग

Posted On: 13 APR 2026 2:52PM by PIB Mumbai

नवी मुंबई/ मुंबई, 13 एप्रिल 2026

 

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राने 'फिट इंडिया' चळवळीअंतर्गत 'माय भारत'च्या सहकार्याने, तरुण आणि नागरिकांमध्ये फिटनेस आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे 'संडेज ऑन सायकल'ची 69 व्या आवृत्तीचे  यशस्वी आयोजन केले.

प्रामुख्याने राज्यातील युवा नेत्यांवर लक्ष केंद्रित केलेल्या या उपक्रमात  400 हुन अधिक युवक, विद्यार्थी आणि सामुदायिकपणे सायकल चालवण्याच्या माध्यमातून फिटनेस अर्थात शारीरिक तंदरुस्ती आणि निरोगी आयुष्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या माय भारतच्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या रॅलीने खारघरमधून विनायक सेठ चौक, खारघर फुटबॉल स्टेडियम आणि सेक्टर 27 मार्गे सुमारे 5 किलोमीटरचे अंतर पार करत स्थानिक समुदायामध्ये फिटनेसविषयी प्रभावीपणे जागरूकता निर्माण केली.

   

या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार  प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी बी.डी. सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. आपल्या तरुणांनी दाखवलेला हा उत्साह खरोखरच प्रेरणादायी आहे, असे ते यावेळी म्हणाले. संडेज ऑन सायकल सारखे उपक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीलाच चालना देत नाही तर एक निरोगी आयुष्य जगण्याकरता आवश्यक जागरूकतेचा संदेश देतो. युवकांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित केलेले अशाप्रकारचे उपक्रम मजबूत आणि आरोग्यपूर्ण राष्ट्र घडवण्यासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.

   

या कार्यक्रमात ग्रुप सायकलिंग, युवा सहभाग उपक्रम आणि सहभागींसोबत संवाद यांचा समावेश होता. यामुळे 'फिट युवा – फिट भारत – फिट नेशन' या संकल्पनेला बळकटी मिळाली.

फिट इंडिया उपक्रमाला  अधिक प्रभावी करण्यासह दैनंदिन आयुष्यात सायकलिंगला एक अविभाज्य भाग बनवण्यासाठी नागरिकांना  प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251504) अभ्यागत कक्ष : 50
Read this releasein: English