औषधनिर्मिती विभाग
नवी दिल्लीत 13–14 एप्रिल दरम्यान, इंडिया फार्मा 2026 चे आयोजन, क्षेत्रीय नवोन्मेष प्रदर्शित करण्यासाठीचे व्यासपीठ
धोरणकर्ते आणि जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख उद्योजक यानिमित्ताने ऐतिहासिक जीवन-विज्ञान संवादासाठी येणार एकत्र
Posted On:
11 APR 2026 3:08PM by PIB Mumbai

केंद्र सरकारच्या रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत औषधनिर्माण विभाग, नवव्या इंडिया फार्मा- 2026 या परिषदेचे आयोजन करत आहे. या परिषदेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (IPA) यांच्या सहकार्याने 13-14, एप्रिल 2026 एप्रिल ला फेडरेशन हाऊस, फिक्की , नवी दिल्ली इथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते होईल. ही परिषद क्षेत्रीय विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते, ज्यामध्ये भारताची औषधनिर्माण क्षमता, संशोधन आणि विकास तसेच जागतिक पुरवठा साखळ्या मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
या वर्षीच्या आवृत्तीची संकल्पना "भारतात नवोन्मेष : जीवन-विज्ञान नवोन्मेषातील अभूतपूर्व प्रगती " अशी आहे . भारताला, जागतिक औषधनिर्माण संशोधन केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप असलेली ही संकल्पना, आरोग्यसेवा सर्वांपर्यंत पोहचवणे , आर्थिक विकासाला चालना देणे आणि जागतिक आरोग्य प्रणाली मजबूत करण्यात जीवन-विज्ञानाची परिवर्तनात्मक क्षमता अधोरेखित करते. परवडणाऱ्या आणि उच्च-गुणवत्तेच्या औषधांच्या जागतिक पुरवठ्यात भारत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या भक्कम पायावर आधारित, इंडिया फार्मा 2026 चे उद्दिष्ट या क्षेत्राला उत्पादन आधारित मॉडेलकडून मूल्य-आधारित आणि नवोन्मेष आधारित जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने संक्रमणाला गती देणे हे आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात औषधनिर्मिती क्षेत्रातील धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होतील.
***
राधिका अघोर/सुषमा काणे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2251134)
अभ्यागत कक्ष : 14