परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पिंपरी-चिंचवडच्या पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात सामान्य आणि तत्काळ पारपत्र आवेदकांसाठी 11 एप्रिल 2026 रोजी विशेष पारपत्र मोहीम

Posted On: 09 APR 2026 6:29PM by PIB Mumbai

पुणे, 9 एप्रिल 2026

पुण्याच्या, प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने, सामान्य पारपत्र आवेदकांसाठी एक विशेष. पारपत्र मोहीम आयोजित केली आहे. आरपीओ पुण्याच्या अधिकारक्षेत्रातील, पिंपरी चिंचवड पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात, 11 एप्रिल 2026 रोजी ही मोहीम राबवली जाणार आहे. पारपत्रासाठीच्या मुलाखतीची लवकरात लवकर तारीख मिळावी आणि पारपत्र सेवा अधिक सक्षम तसेच जलद करावी, या परराष्ट्र मंत्रालयाच्या धोरणाला अनुसरून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सामान्य पारपत्र श्रेणीसाठी, आवेदकांनी, पासपोर्ट नियमांनुसार, त्यांची संपूर्ण आणि अचूक कागदपत्रे सादर करणे अभिप्रेत असते. पासपोर्ट इंडिया च्या संकेतस्थळावर या संदर्भात दिलेल्या सूचना आणि नियम आवेदकांनी काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले असून, मुलाखतीच्या दिवशी,संपूर्ण कागदपत्रे असल्याची खातरजमा करून, वेळेवर होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. अपुऱ्या किंवा चुकीच्या कागदपत्रांमुळे, आवेदकांचा अर्ज फेटाळला जाण्याचीही शक्यता असते.

[आवेदकाची सत्यता तपासण्यासाठी, पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 5 मधील पासपोर्ट रूल्स 1980 मधला नियम 5 तपासावा. यानुसारम पारपत्र अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची चौकशी करण्याचा अधिकार असून, त्यानुसार जर संबंधित अधिकाऱ्याला आवश्यक वाटले, तर कदाचित आवेदकाला काही अतिरिक्त माहिती, कागदपत्रे देखील सादर करावी लागतील, तरच, आवेदकाचा अर्ज मंजूर होऊ शकेल.)

सामान्य मुलाखतीच्या विशेष मोहिमेचा लाभ कसा घ्यावा? :

i.पासपोर्ट इंडिया च्या संकेतस्थळाला (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport   Seva App (एम पासपोर्ट सेवा अॅप) ला भेट द्या  आणि सामान्य (NORMAL) योजनेअंतर्गत, अर्ज सादर करा. 

ii.ऑनलाईन पेमेंट केल्यावर, नियोजित मुलाखत (‘Schedule Appointment’) पेजवर जा, तिथे आपल्या पसंतीचे  PSK/POPSK लोकेशन निवडा आणि या विशेष मोहिमेसाठीच्या मुलाखतीची वेळ निश्चित करा.

विशेष सूचना : ही मोहीम केवळ, सामान्य पारपत्रांसाठीच आहे, याची नोंद घ्यावी. तत्काळ श्रेणी तसेच वॉक-इन आवेदकांना  प्रवेश दिला जाणार नाही.

विशेष मोहिमेची तारीख आणि स्थळविषयक माहिती:

1.तारीख : 11 एप्रिल 2026 (शनिवार)

i.स्थळ : पीएफ पोस्ट ऑफिस खरळकर वाडी, हिंदुस्थान अॅंटीबायोटिक फॅक्टरीच्या समोर, जुना मुंबई- पुणे महामार्ग, पिंपरी, पुणे  411018.

ii.श्रेणी : केवळ सामान्य पारपत्र मुलाखती  (नव्या आणि पुनरुज्जीवित  करण्याच्या)

iii.वेळ:  सकाळी 09:00 ते 17:00 (आवेदकांनी त्यांच्या नियोजित मुलाखतीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी हजर राहावे.

शैलेश पाटील/राधिका अघोर/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250554) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English