रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांविषयी लोकसभेत दिली माहिती


भारतीय रेल्वेने लातूर येथे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी (एमआरसीएफ) स्थापन केली आहे

फलटण – पंढरपूर या 109 किमी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सर्वेक्षण झाले पूर्ण

Posted On: 01 APR 2026 4:59PM by PIB Mumbai

 

लोकसभेत बिगर- तारांकित प्रश्नांना लेखी उत्तर देताना, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे विषयक पायाभूत सुविधांबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, फलटण – पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचे (109किमी) सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे.

डीपीआर तयार झाल्यानंतर, प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारांसह विविध संबंधितांशी सल्लामसलत करणे तसेच नीती आयोग आणि अर्थ मंत्रालयाकडून मूल्यांकनासारख्या आवश्यक मंजुऱ्या घेणे आवश्यक असते. प्रकल्पांना मंजुरी देणे ही एक निरंतर आणि गतिमान प्रक्रिया असून नेमकी कालमर्यादा या मूल्यांकनांवर आणि मंजुऱ्यांवर अवलंबून असते.

आधुनिक रेल्वेगाड्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्वदेशी डबे निर्मितीची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील लातूर येथे 685.79 कोटी रुपये खर्च करून मराठवाडा रेल कोच फॅक्टरी (एमआरसीएफ) उभारली आहे. एमआरसीएफ, लातूर येथे तंत्रज्ञान भागीदाराच्या माध्यमातून 120 'वंदे भारत' ट्रेनसेटच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे.

तसेच डबे निर्मितीबाबत सुव्यवस्थित आणि पद्धतशीर प्रशिक्षण सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून, संबंधित कर्मचाऱ्यांना त्या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंचा समावेश असलेल्या विस्तृत प्रशिक्षण मॉड्यूलनुसार प्रशिक्षण दिले जाते. या मॉड्यूलमध्ये डबे निर्मितीसाठी आवश्यक असलेले फॅब्रिकेशन तंत्र, वेल्डिंग प्रक्रिया, बोगी प्रणाली, इलेक्ट्रिकल इत्यादी विषयांचा समावेश असतो.

याशिवाय, भारतीय रेल्वे शिकाऊ उमेदवार कायदा, 1961च्या तरतुदींनुसार उत्पादन युनिट्स, कार्यशाळा, लोको शेड्स, कॅरेज आणि वॅगन डेपो यांसारख्या आपल्या विविध युनिट्समध्ये शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित करते, ज्यामुळे फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि मशिनिस्ट यांसारख्या व्यवसायांमधील कौशल्य विकासालाही हातभार लागतो.

नाशिक रोड आणि कल्याण दरम्यान रेल्वे सेवा:

नाशिक आणि कल्याण दरम्यान ईएमयू/स्वयंचलित बंद होणाऱ्या दरवाजांचे ट्रेन सेट सुरू करण्यातील अडचणींच्या तपशिलावर उत्तर देताना, मंत्र्यांनी नमूद केले की, ईएमयू स्टॉकची (या भागातील लोकल ट्रेन) रुंदी प्रवासी गाड्यांच्या इतर रोलिंग स्टॉकपेक्षा जास्त आहे. कसारा-इगतपुरी घाट विभाग आणि कर्जत-लोणावळा विभागातील बोगद्यांमध्ये आकारमानाची मर्यादा असल्या कारणाने सध्या या विभागांमध्ये ईएमयू लोकल ट्रेन चालवणे शक्य नाही.

सध्या, नाशिक रोड-कल्याण मार्गावर खालील 67 रेल्वे सेवेच्या जोड गाड्या कार्यरत आहेत:

SN

Train No. & Name

1

11001/11002 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Balharshah Express

2

11011/11012 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Dhule Express

3

11015/11016 Lokmanya Tilak(T)-Saharsa Amrit Bharat Express

4

11031/11032 Panvel-Alipur Duar Amrit Bharat Express

5

11055/11056 Lokmanya Tilak(T)-Gonda Godan Express

6

11057/11058 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Amritsar Express

7

11059/11060 Lokmanya Tilak(T)-Chhapra Express

8

11061/11062 Lokmanya Tilak(T)-Jaynagar Express

9

11071/11072 Lokmanya Tilak(T)-Ballia Kamayani Express

10

11079/11080 Lokmanya Tilak(T)-Gorakhpur Express

11

11081/11082 Lokmanya Tilak(T)-Gorakhpur Express

12

12071/12072 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Hingoli Deccan Jan Shatabdi Express

13

12105/12106 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Gondia Vidarbha Express

14

12107/12108 Lokmanya Tilak(T)-Sitapur Express

15

12109/12110 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Manmad Panchavati Express

16

12111/12112 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Amravati Express

17

12131/12132 Dadar-Sainagar Shirdi Express

18

12137/12138 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Firozpur Cantt. Punjab Mail

19

12139/12140 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Nagpur Sewagram Express

20

12141/12142 Lokmanya Tilak(T)-Patliputra Express

21

12145/12146 Lokmanya Tilak(T)-Puri Express

22

12151/12152 Lokmanya Tilak(T)-Shalimar Samarsata Express

23

12161/12162 Lokmanya Tilak(T)-Agra Cantt. Lashkar Express

24

12165/12166 Lokmanya Tilak(T)-Gorakhpur Express

25

12167/12168 Lokmanya Tilak(T)-Banaras Express

26

12171/12172 Lokmanya Tilak(T)-Haridwar Express

27

12173/12174 Lokmanya Tilak(T)-Maa Belha Devi Dham Pratapgarh Express

28

12187/12188 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Jabalpur Garib Rath Express

29

12321/12322 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Howrah Kolkata Mail

30

12335/12336 Lokmanya Tilak(T)-Bhagalpur Express

31

12533/12534 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Gomti Nagar Pushpak Express

32

12617/12618 Ernakulam-Hazrat Nizamuddin Mangala Lakshadweep Express

33

12741/12742 Vasco-da-Gama-Patna Express

34

12809/12810 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Howrah Express

35

12811/12812 Lokmanya Tilak(T)-Hatia Express

36

12859/12860 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Howrah Gitanjali Express

37

12869/12870 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Howrah Express

38

12879/12880 Lokmanya Tilak(T)-Bhubaneswar Express

39

13201/13202 Lokmanya Tilak(T)-Rajgir Express

40

14313/14314 Lokmanya Tilak(T)-Bareilly Express

41

15017/15018 Lokmanya Tilak(T)-Gorakhpur Kashi Express

42

15065/15066 Panvel-Gorakhpur Express

43

15181/15182 Lokmanya Tilak(T)-Mau Express

44

15267/15268 Lokmanya Tilak(T)-Raxaul Antyoday Express

45

15647/15648 Lokmanya Tilak(T)-Guwahati Express

46

15659/15660 Lokmanya Tilak(T)-Agartala Express

47

15945/15946 Lokmanya Tilak(T)-Dibrugarh Express

48

17057/17058 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Lingampalli Devagiri Express

49

17611/17612 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Nanded Express

50

17617/17618 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Nanded Tapovan Express

51

18029/18030 Lokmanya Tilak(T)-Shalimar Express

52

18609/18610 Lokmanya Tilak(T)-Ranchi Express

53

20705/20706 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Nanded Vande Bharat Express

54

22103/22104 Lokmanya Tilak(T)-Ayodhya Cantt. Express

55

22109/22110 Lokmanya Tilak(T)-Balharshah Express

56

22121/22122 Lokmanya Tilak(T)-Lucknow Express

57

22129/22130 Lokmanya Tilak(T)-Ayodhya Cantt. Tulsi Express

58

22147/22148 Dadar-Sainagar Shirdi Express

59

22177/22178 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Banaras Mahanagari Express

60

22183/22184 Lokmanya Tilak(T)-Ayodhya Cantt. Express

61

22221/22222 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Hazrat Nizamuddin Rajdhani Express

62

22223/22224 Chhatrapati Shivaji Maharaj(T)-Sainagar Shirdi Vande Bharat Express

63

22311/22312 Lokmanya Tilak(T)-Godda Express

64

22357/22358 Lokmanya Tilak(T)-Gaya Express

65

22537/22538 Lokmanya Tilak(T)-Gorakhpur Kushinagar Express

66

22583/22584 Lokmanya Tilak(T)-Chhapra Antyoday Express

67

22847/22848 Lokmanya Tilak(T)-Visakhapatnam Express

 

त्याचप्रमाणे, कसारा-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज (ट) विभागात 36 उपनगरीय रेल्वे सेवा कार्यरत आहेत.

हिंगोली डेक्कन स्थानकाचे आधुनिकीकरण:

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे पायाभूत सुविधांविषयीच्या बिगरतारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल मंत्र्यांनी सांगितले की, हिंगोली डेक्कन स्थानकावर फलाट छप्पर उभारण्याचे आणि फलाट क्रमांक 2 च्या पृष्ठभागामध्ये सुधारणा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवीन स्थानक इमारत, विद्यमान स्थानक इमारतीची सुधारणा, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 चा पृष्ठभाग, उद्वाहन आणि 12 मीटर लांबीचा पादचारी पूल ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

सध्या, हिंगोली डेक्कन स्थानकावरून 38 रेल्वे सेवांची वाहतूक चालते, ज्याद्वारे मुंबई, पुणे, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू आणि जयपूर यांसारख्या विविध शहरांशी संपर्क प्रस्थापित होतो. सध्या हिंगोली डेक्कन हे स्थानक 12071/12072 छत्रपती शिवाजी महाराज (ट) - हिंगोली डेक्कन जन शताब्दी एक्सप्रेस या दैनंदिन सेवेद्वारे मुंबईशी, तर 11405/06 पुणे - अमरावती एक्सप्रेस या द्विसाप्ताहिक सेवेद्वारे पुण्याशी जोडलेले आहे. हिंगोली डेक्कन स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

SN

Train No & Name

1

11403 Nagpur -Kolhapur Express

2

11404 Kolhapur-Nagpur Express

3

11405 Pune-Amravati Express

4

11406 Amravati-Pune Express

5

12071 Chhatrapati Shivaji Maharaj (T) -Hingoli Deccan Express

6

12072 Hingoli Deccan-Chhatrapati Shivaji Maharaj (T) Express

7

12421 Nanded-Amritsar Express

8

12422 Amritsar-Nanded Express

9

12439 Nanded-Shri Ganganagar Express

10

12440 Sri Ganganagar-Nanded Express

11

12485 Nanded-Shri Ganganagar Express

12

12486 Sri Ganganagar-Nanded Express

13

12719 Jaipur -Hyderabad Express

14

12720 Hyderabad-Jaipur Express

15

12751 Nanded-Jammu Tawi Express

16

12752 Jammu Tawi -Nanded Express

17

12765 Tirupati-Amravati Express

18

12766 Amravati-Tirupati Express

19

17605 Kacheguda-Bhagat Ki Kothi Express

20

17606 Bhagat Ki Kothi-Kacheguda Express

21

17639 Kacheguda-Akola Express

22

17640 Akola -Kacheguda Express

23

17641 Kacheguda-Narkher Express

24

17642 Narkher-Kacheguda Express

25

17683 Akola -Purna Express

26

17684 Purna -Akola Express

27

19301 Dr. Ambedkar Nagar -Yesvantpur Express

28

19302 Yesvantpur - Dr. Ambedkar Nagar Express

29

19713 Jaipur -Kurnool City Express

30

19714 Kurnool City-Jaipur Express

31

22709 Nanded-Amb Andaura Express

32

22710 Amb Andaura-Nanded Express

33

22723 Nanded-Shri Ganganagar Express

34

22724 Shri Ganganagar-Nanded Express

35

57655 Parli Vaijnath-Akola Passenger

36

57656 Akola -Purna Passenger

37

77613 Purna -Akola DMU

38

77614 Akola -Parli Vaijnath DMU

 

याशिवाय, नवीन गाड्या सुरू करणे, विद्यमान गाड्यांचा विस्तार करणे किंवा गाड्यांच्या फेऱ्यांची वारंवारता वाढवणे, तसेच देशभरातील रेल्वे प्रकल्प व कामांशी संबंधित औपचारिक आणि अनौपचारिक प्रस्ताव, विनंत्या, सूचना व निवेदने; रेल्वे मंडळ, विभागीय रेल्वे आणि विभाग कार्यालये यांसारख्या विविध स्तरांवर संसद सदस्य, लोकप्रतिनिधी, संस्था आणि रेल्वे प्रवासी इत्यादींकडून प्राप्त होत असतात. असे प्रस्ताव, विनंत्या व सूचना प्राप्त होण्याची प्रक्रिया ही निरंतर आणि गतिमान स्वरूपाची असल्याने या विनंत्यांचा कोणताही केंद्रीयकृत संग्रह (compendium) राखला जात नाही. तथापि, या विनंत्यांची छाननी केली जाते आणि ज्या उपाययोजना व्यवहार्य व न्यायोचित असल्याचे आढळते, त्यांवर वेळोवेळी योग्य ती कार्यवाही केली जाते.

ही माहिती आज लोकसभेत रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

***

नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2247845) अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein: English