संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परिवर्तनकारी आणि कार्यान्वयनाच्या दृष्टीने लक्ष्यित कार्यकाळानंतर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ दक्षिणी कमांडच्या नेतृत्वपदावरुन पायउतार

प्रविष्टि तिथि: 31 MAR 2026 4:00PM by PIB Mumbai

 

परिचालनात्मक एकाग्रता, संस्थात्मक परिवर्तन आणि भविष्याच्या दृष्टीने सज्ज सेवा उभारण्याच्या दृढ वचनबद्धतेच्या झळाळत्या कार्यकाळानंतर पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम अशा सन्मानांनी गौरवान्वित लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आज, 31 मार्च 2026 रोजी दक्षिणी कमांडच्या नेतृत्वपदावरुन पायउतार झाले. लष्कराच्या कमांडरांनी दक्षिणी कमांड युध्द स्मारकापाशी पुष्पचक्र अर्पण करून देशसेवा करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना गंभीर वातावरणात श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, दक्षिणी कमांडच्या मुख्यालयात त्यांना मानवंदना देण्यात आली.

दक्षिणी कमांडमधील सर्व श्रेणीच्या जवानांना दिलेल्या संदेशात लष्कर कमांडर धीरज यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, बहु-क्षेत्रीय मोहिमांसाठी युध्दकौशल्यांमध्ये अधिक सुधारणा करुन आणि भविष्यासाठी सज्ज दलाचा पाया मजबूत करून दक्षिणी कमांडची कार्यान्वयन आघाडी टिकवून ठेवण्याचा आग्रह केला.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ उद्या, दिनांक 01 एप्रिल 2026 पासून लष्कराचे उपप्रमुख (व्हीसीओएएस) म्हणून पदभार स्वीकारतील. 

***

माधुरी पांगे/संजना चिटणीस/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2247363) आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English