पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय जलक्रीडा संस्था (NIWS)– भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या (IITTM) वतीने नौदल जवानांसाठी गोव्यात 'जीवनरक्षक तंत्र' प्रशिक्षण शिबिर संपन्न

Posted On: 29 MAR 2026 1:41PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय जलक्रीडा संस्था – भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या वतीने 23 ते 28 मार्च 2026 या कालावधीत भारतीय नौदलाच्या शारीरिक प्रशिक्षण विद्यालयाच्या अधिकाऱ्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या अभ्यासक्रमात जीवनरक्षक तंत्र – जलतरण तलाव/समुद्रकिनारा/मुक्त जल या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या सखोल प्रशिक्षणामध्ये 'जलतरण तलाव रक्षक तंत्रे' 'समुद्रकिनारा रक्षण आणि सर्फबोर्डद्वारे बचाव, खुल्या पाण्यातील बचावकार्य' आणि 'पॉवर बोट हाताळणी' यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता.

या अभ्यासक्रमाचा मुख्य भर हा समुद्री वातावरणातील बचावकार्य, आपद्ग्रस्तांची हाताळणी आणि आपत्कालीन प्रतिसादाशी संबंधित व्यावहारिक कौशल्ये वृद्धिंगत करण्यावर होता. सर्व सहभागींनी उच्च दर्जाची शिस्त आणि व्यावसायिकता दर्शविली असून, पाण्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी ते अधिक सक्षम झाले आहेत.

या कार्यक्रमात एकूण 14 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला; यामध्ये भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, मॉरिशस पोलीस दल आणि श्रीलंकन ​​नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या अभ्यासक्रमाची यशस्वी सांगता ही, जीवनरक्षक प्रशिक्षण आणि जलसुरक्षेच्या क्षेत्रातील क्षमता बांधणीमध्ये उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवण्याच्या राष्ट्रीय जलक्रीडा संस्था – भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्था गोवाची कटिबद्धता अधोरेखित होते. 

***

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2246648) अभ्यागत कक्ष : 68
Read this releasein: English