श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नागपूर कार्यालयात निष्क्रिय खात्यांमधून सदस्यांना पैसे पाठवण्यासाठी विशेष मोहीम
Posted On:
27 MAR 2026 7:00PM by PIB Mumbai
नागपूर, 27 मार्च 2026
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील, ईपीएफओ म्हणजेच, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या, नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयाने, निष्क्रिय ईपीएफ खात्यांमधून, पैसे ग्राहकांच्या इतर खात्यात जमा करण्यासाठीची विशेष जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेव्दारे सदस्यांना सामाजिक सुरक्षा निधीचे लाभ वेळेत मिळतील, हे सुनिश्चित केले आहे.
या नागरिककेंद्री उपक्रमाचा भाग म्हणून, नागपूर कार्यालयाने, जनजागृती, हितसंबंधियांशी चर्चा आणि तात्काळ सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘निधी आपके निकट’ या मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणून, जिल्हास्तरावर जनसंपर्क मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, सदस्य, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक अशा सर्वांशी चर्चा करुन, तिथल्या तिथे त्यांच्या शंकांचे समाधान केले जात आहे.
यासाठी समर्पित मदतकक्ष, जनसंपर्क अधिकारी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले असून, संबंधितांना ‘यू ए एन’ म्हणजे सार्वत्रिक खाते क्रमांक, के वाय सी अद्ययावतीकरण आणि दावे भरणे अशा सगळ्यात मदत केली जात आहे.
ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय, नागपूरसाठी संपर्क क्रमांक – मुख्य इमारत- 0712-2742012/13, अॅनेक्स इमारत- 0712-2756765, 0712-2746734.
बँक खात्यांचे ‘सीडिंग’, आधार पडताळणी आणि केवायसी अनुपालन अशा विशेष सेवाही इथे दिल्या जात असून, त्याद्वारे ऑनलाईन दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुरळीत आणि सुलभ होते आहे. निष्क्रिय खाती असलेल्या सदस्यांना त्यांच्या खात्यात जमा रक्कम मिळवण्यासाठी दावा करण्याबाबत प्रोत्साहन दिले जात आहे.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सुपरिणाम दिसू लागले असून, 13 मार्च 2026 पर्यंत, 577 निष्क्रिय खात्यातली 18,17,32,763 इतकी रक्कम, संबधितांच्या खात्यात थेट जमा केली गेली आहे.
प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त- 1 आणि प्रभारी अधिकारी, शेखर कुमार यांनी सांगितले, “ईपीएफओच्या, यूएनएन आधारित सेवा, आधार पडताळणी आणि बँक खाते सीडिंग अशा डिजिटल सुविधांसह आम्ही निश्चित लोकांशी संपर्क साधून त्यांना विनासायास आपले दावे निकाली काढता येतील, यांसातही मदत करतो आहोत.”
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2246278)
अभ्यागत कक्ष : 71